शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:54 AM

गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

मुंबई : गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच आझाद मैदानात ‘जय किसान’च्या ना-यासह टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.महाराष्टÑ किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला हजारो शेतकºयांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत धडकला. मात्र मुंबईच्या जनजीवनात कुठेही अडथळा आला नाही. परीक्षेला जाणाºया विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून रात्रीतून हे मोर्चेकरी आझाद मैदानाकडे रवाना झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मोर्चेकºयांचे शिष्टमंडळ विधानभवनात पोहोचले आणि तब्बल अडीच तास मुख्यमंत्री, काही मंत्री, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. मोर्चेकºयांच्या सर्व मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे लेखी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा माकपाचे आमदार जे.पी.गावित यांनी आझाद मैदानावर मोर्चेकºयांसमोर केली. मंत्री चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकºयांना चर्चेचा तपशील वाचून दाखवण्यात आला. शेतकºयांच्या परतीसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली.१८० किमीच्या पायपिटीमुळे अनेक शेतकºयांचे पाय सोलून निघाले.सोशल मीडियावरही याबद्दल प्रचंडहळहळ व्यक्त होत होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे,पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा आणि सुभाष देशमुख हे मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, किसान सभेचे सचिव कॉ. अजित नवले, राज्य अध्यक्ष किसन गुजर, माजी आमदार नरसय्या आडम, इंद्रजित गावित, इरफान शेख, उमेश देशमुख, सुनील चौधरी, सावळीरावम पवार आदी उपस्थित होते.>या मागण्या केल्या मान्य२००१-०८ दरम्यान वंचित शेतकºयांनाही कर्जमाफी कृषीबरोबरच मुदत कर्जालाही माफी केंद्राची वाट न पाहता बोंडअळी नुकसानभरपाईजीर्ण रेशन कार्ड बदलून मिळणार संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे मानधन वाढणार महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाहीवनजमिनीचे दावे सहा महिन्यांत काढणार निकाली

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च