शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

किरण भगतला विजेतेपद

By admin | Updated: June 10, 2016 01:48 IST

राज्य निमंत्रित कुस्ती स्पर्धेत किरण भगत याने बाला रफिक याच्यावर पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवीत मुख्य लढत जिंकली.

पिंपरी : राज्य निमंत्रित कुस्ती स्पर्धेत किरण भगत याने बाला रफिक याच्यावर पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवीत मुख्य लढत जिंकली.भिकू वाघेरे प्रतिष्ठानतर्फे दिगंवत महापौर भिकू वाघेरे यांच्या स्मरणार्थ पिंपरी गावात स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत राज्यभरातील नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. माती गटात झालेल्या क्रमांक एकच्या कुस्तीत भगतने जय प्राप्त केला. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व साईनाथ रानवडे यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. सुमारे पाऊण तास अटीतटीची लढत झाली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत माऊली जमदाडेने रवी गायकवाडवर झोळी डावावर विजय मिळवला. स्पर्धेत एकूण ४५ लढती झाल्या. विजेत्यांना चांदीची गदा आणि रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते वाघेरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार नाना नवले, अशोक मोहोळ, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश लाड, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर रंगनाथ फुगे, आझम पानसरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, बाळासाहेब बोडके, डब्बू आसवानी, विठ्ठल काटे, प्रशांत शितोळे, कैलास थोपटे, नीलेश पांढरकर, संदीप चिंचवडे, जगदीश शेट्टी, दत्ता पवळे, राजेश लाडे, दत्तात्रय वाघेरे, श्रीरंग शिंदे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात १५० जणांनी सहभाग घेतला. सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब लांडगे म्हणाले, ‘‘तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेला नरसिंग यादव आॅलिम्पिकला जात आहे. दिल्ली महाराष्ट्राला सहजासहजी न्याय देत नाही. कोणत्याही सुविधा नसताना महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी १९५२मध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. नरसिंगकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मातीतील कुस्ती संथ, तर मॅटवरील कुस्ती गतिमान आहे. मॅटवरील कुस्तीला आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये महत्त्व आले आहे. त्यामुळे पारंपरिक कुस्ती पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.’’ (प्रतिनिधी)>निकाल : अक्षय शिंदे वि. वि. समीर कोळेकर. प्रसाद सस्ते वि. वि. अमोल राक्षे. सतपाल सोनटक्के वि. वि. विनोद शिंदे. नागेश वाडेकर वि. वि. शेखर शिंदे. वैभव हारगुडे वि.वि. प्रतीक चौगुले. संकेत चव्हाण वि.वि. सुशांत फेंगसे. केतन यरुडे वि. वि. सागर चौधरी. रलेश बोरगे वि. वि. मयूर गुतवणे. अजिंक्य भोंडवे वि. वि. निखिल जगताप. रोहित कलापुरे वि. वि. आकाश पाचारणे. चेतन कलापुरे वि. वि. प्रीतम घोरपडे. पृथ्वीराज मोहोळ वि.वि. कुणाल शिंदे. पार्थ कंधारे वि. वि. राकेश यादव. गणेश साठे वि. वि. सागर जाधव. आदेश वाळुंज वि. वि. सिद्धांत शिंदे.