वाघाच्या हल्ल्यात एक ठार, तीन शेतक:यांची बिबटय़ाशी झुंज
By Admin | Updated: July 27, 2014 01:40 IST2014-07-27T01:40:38+5:302014-07-27T01:40:38+5:30
संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत वनाची राखण करणा:या चौकीदारावरच शुक्रवारी वाघाने हल्ला करून ठार केले. त्यानंतर मृतदेहाजवळ दोन वाघांनी ठिय्या मांडला होता.

वाघाच्या हल्ल्यात एक ठार, तीन शेतक:यांची बिबटय़ाशी झुंज
देवाडा खुर्द (जि. चंद्रपूर) : संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत वनाची राखण करणा:या चौकीदारावरच शुक्रवारी वाघाने हल्ला करून ठार केले. त्यानंतर मृतदेहाजवळ दोन वाघांनी ठिय्या मांडला होता. घनोटी येथील जंगल परिसरात कक्ष क्रमांक 87 मध्ये ही घटना घडली. पांडुरंग धोंडू आत्रम (55) असे मृताचे नाव आहे. पांडुरंग आत्रम, असे चौकीदाराचे नाव आह़े
घटनेची माहिती गुराख्यांनी गावात दिली. त्यानंतर गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी पांडुरंग आत्रम यांच्या प्रेताजवळ दोन वाघ बसून होते. लोकांनी आरडाओरड केल्याने व लाठय़ाकाठय़ांचा आवाज केल्याने दोन्ही वाघ पळून गेले. काही अंतरावर परत एका वाघाने एका गाईला ठार केले व तो वाघ तिथेच दबा धरून बसला. काही गावकरी त्या ठिकाणी गेले असता वाघ त्यांच्या दिशेने धावून आला. त्यामुळे गावक:यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कोठारी वन परिक्षेत्रचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला.
वन अधिकारी घटनास्थळी पोचताच जमलेल्या गावक:यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला. वाघांचा तात्काळ बंदोबस्त करा व आर्थिक मदत द्या अन्यथा मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका गावक:यांनी घेतली. त्यानंतर मागण्या मान्य केल्याचे वन अधिका:यांनी हमीपत्र लिहून दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. (वार्ताहर)
च्तळेगाव (श्या.पं.) (जि. वर्धा) : कुटार घेण्यासाठी शेतातील गोठय़ात गेलेल्या शेतक:यावर आधीच दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने झडप घातली. त्याच्या ओरडण्याने जवळच असलेला त्याचा भाऊ व शेजारच्या शेतक:याने लोखंडी सळाख घेऊन धाव घेतली. तिघांनीही बिबटय़ाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तिघांच्या आवाजाने परिसरातील शेतक:यांनीही घटनास्थळ गाठून बिबटय़ाला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. बिबटय़ाच्या या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी झाले असून, एक गंभीर आहे.
च्आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं.) परिसरातील जुनोना चुनाभट्टी शिवारात शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा थरार शेतक:यांनी अनुभवला. बिबटय़ा परत जात असताना पुन्हा तो हल्ला करण्याच्या बेतात असल्याचे लक्षात येताच वाटेतील एक शेतकरी प्रसंगावधान राखून झाडावर चढल्याने सुदैवाने बचावला.
च्वसंत मांढळे (54), त्याचा भाऊ सुधाकर मांढळे (52) व प्रवीण लक्ष्मण बहिरमकार (3क्) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना आर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसंतला प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले