तहसीलदारास जिवंत जाळणारा दोषी
By Admin | Updated: August 19, 2014 02:25 IST2014-08-19T02:25:01+5:302014-08-19T02:25:01+5:30
मुकेश जितेंद्र स्वामी (33) याला ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून मंगळवारी अंतिम शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

तहसीलदारास जिवंत जाळणारा दोषी
ठाणो : वाडय़ाचे तत्कालीन तहसीलदार संतोष शिंदे यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ (ऑइल) टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करणा:या मुकेश जितेंद्र स्वामी (33) याला ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून मंगळवारी अंतिम शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
वाडय़ातील पाटील आळीत राहणा:या आरोपी मुकेशने तत्कालीन वाडा तहसीलदार शिंदे यांच्याकडे एका कंपनीच्या खदाणीच्या कामाबाबत निवेदन दिले होते. त्याचे पुढे काय झाले, याची विचारणा मुकेशने लावून धरली होती. त्या वेळीच शिंदे यांनी ते निवेदन पुढे पाठवण्यात आल्याचे त्याला सांगितले होते. मात्र, मुळात सरकारी कर्मचा:यांना त्रस देण्याचा पिंड असलेल्या मुकेशने त्यांच्याविरोधात तहसीलदार कार्यालयासमोर धरणो आंदोलन पुकारले होते. याचदरम्यान, 11 जुलै 2क्11 रोजी वाडय़ातील आंबिस्ते ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर शिंदे हे पावणोबाराच्या सुमारास तेथून बाहेर पडले. त्या वेळी लपवून ठेवलेल्या ऑइलच्या कॅनमधील ज्वलनशील पदार्थ मुकेशने त्यांच्या अंगावर ओतला. त्याच वेळी शिंदे यांनी प्रसंगावधान राखून त्याला खाली ढकलून दिले. या वेळी खाली पडलेल्या मुकेशला पोलिसांनी पकडल्याने शिंदे बचावले. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात मुकेशविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे. काळे यांच्या न्यायालयात आल्यावर प्रत्यक्षदर्शीसह वैद्यकीय अधिकारी अशा 12 साक्षीदारांची साक्ष घेऊन त्याच्यावर सरकारी कामात अडथळा करण्यास व जीवे मारण्याच्या उद्देशाने आल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. मंगळवारी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने अॅडव्होकेट संगीता फड यांनी भक्कम बाजू मांडली. (प्रतिनिधी)
कठोर शिक्षेसाठी प्रयत्न
च्याप्रकरणात आतार्पयत
12 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
च्आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने अॅडव्होकेट संगीता फड यांनी भक्कम बाजू मांडली.