चिमुकल्या अपहृत युगची हत्या

By Admin | Updated: September 3, 2014 01:37 IST2014-09-03T01:37:02+5:302014-09-03T01:37:02+5:30

दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या क्रूरकर्मांनी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखालून

Kidney killer kidnapping era | चिमुकल्या अपहृत युगची हत्या

चिमुकल्या अपहृत युगची हत्या

मृतदेह खापरखेड्याजवळ आढळला : दोन क्रूरकर्मा ताब्यात
नागपूर : दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या क्रूरकर्मांनी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखालून आज शहर पोलिसांनी ताब्यात घेतला. दरम्यान, अपहृत युगची अपहरणकर्त्यांनी हत्या केल्याच्या वृत्ताने उपराजधानीकरांना अक्षरश: हादरवून सोडले आहे.
छापरूनगर चौकाजवळच्या गुरुवंदना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या डॉ. मुकेश चांडक (वय ४०) यांना ध्रृव (वय ११) आणि युग (वय ८) अशी दोन मुले होती. हे दोघेही वाठोड्यातील सेंटर पॉर्इंट स्कूलमध्ये शिकत होते. सोमवारी दुपारी ४ वाजता सेंटर पॉर्इंट स्कूलच्या बसने युग घरी परतला. मात्र, तो घरात गेला नाही. बसमधून उतरताच अपार्टमेंटसमोर स्कुटीवर असलेल्या एका अपहरणकर्त्याने त्याला स्वत:सोबत चलण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे युग आपल्या सहनिवासाच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्याने तेथील चौकीदाराच्या खुर्चीवर शाळेचे दप्तर फेकले अन् धावतच रस्ता दुभाजकापलीकडे गेला. दरम्यान, दोन-अडीच तास होऊनही युग घरी न परतल्याने त्याच्या आईने चौकीदाराकडे विचारणा केली आणि त्यानंतर युगचे अपहरण झाल्याचे उघड झाले. डॉ. चांडक यांनी लगेच लकडगंज पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
हत्येची कबुली
युग ज्या पध्दतीने स्कुटीस्वाराकडे गेला ते बघता अपहरणकर्ता त्याच्या ओळखीचा असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यात तो लाल रंगाचा टी शर्ट घालून असल्याचे कळल्यामुळे तो डॉ. चांडक यांच्या क्लिनिकशी संबंधित असावा, असाही पोलिसांचा कयास होता. पोलिसांनी आजी-माजी कर्मचाऱ्यांसह ४० ते ५० जणांना सोमवारी सायंकाळपासून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. त्यातील अखेर एका संशयिताने (चांडक यांच्याकडील माजी कर्मचाऱ्याने) युगची हत्या केल्याची कबुली दिली.

Web Title: Kidney killer kidnapping era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.