शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

खडवली राया रस्ता गेला खड्ड्यात

By admin | Updated: August 24, 2016 15:37 IST

खडवली राया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने, वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ऑनलाइन लोकमत

टिटवाळा, दि. २४ -  खडवली राया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने, वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की, रोज येथे दोन तीन तरी छोटे मोठे अपघात घडत आहेत. यामुळे नागरिक व वाहन चालक यांच्यातून प्रशासनाविरूध नाराजीचा सूर निघत आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथून केली जात आहे.कल्याण तालुक्यातील खडवली राया हा रस्ता महत्त्वाचा असून देखील या रस्त्याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. या रस्त्यावरून लगतच्या 30 ते 40 गाव, खेड्या पाड्यातील नागरिक व वाहन चालक वाहतुकीसाठी वापरतात. तसेच या रस्त्यावर सततची रहदारी आहे. सदर रस्ता मुंबई नाशिक, कल्याण-नगर, कल्याण-पुणे या महामार्गांना जोडला जातो. यामुळे सहाजिकच हा रस्ता सतत वर्दळीच्या स्वरूपात दिसत आहे. परंतू आज मितीला या रस्त्यावर इतके मोठे मोठे खड्डे पडले आहेत की, यामुळे या रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी येथे वाहन चालवताना मोठीच कसरत करावी लागते. सदर रस्त्यावर वाहने चालविणार्‍या वाहन चालकांना पाठीच्या व मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथून करण्यात येत आहे