शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक, १२ जुलैपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 06:45 IST

फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता.

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. ईडी न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. खडसे यांची पत्नी मंदाकिनी यांना चौकशीचे समन्स बजाविण्यात येईल, असे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी अनिवासी भारतीय (एनआरए) असलेले त्यांचे जावई गिरीश चौधरी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. रात्री १२ वाजेपर्यंत त्यांच्याकडे कसून विचारणा करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्यांना ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. ३१ कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला.  हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. 

एकनाथ खडसेंना समन्स; आज होणार चौकशीभोसरीतील भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर रहाण्याबाबत समन्स बजावले. गुरुवारी सकाळी त्यांना कार्यालयात हजर रहाण्याची सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात खडसे यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात ईडीला सुनावणी सुरु असेपर्यंत त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या समन्सनंतर खडसे यांची प्रकृती खालावल्याने गुरूवारी होणारी त्यांची पुर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीतर्फे ट्वीटद्वारे प्रसारमाध्यमांना कळवण्यात आले आहे.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावPoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर