शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Keshav Upadhye: 'मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू'; केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 14:17 IST

Keshav Upadhye:शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले.

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. दरम्यान, आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली. यानंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आणि राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले. यावरुन संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती, त्यांच्या टीकेला आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'सरकारमध्ये दिवसरात्र तमाशा सुरू'संजय राऊत यांच्या ट्विटला उत्तर देताना केशव उपाध्ये म्हणतात, ''खरोखरच कमाल आहे. पहा ना मंत्रालयात, विधान भवनात मुख्यमंत्री जातच नाहीत. तुम्ही स्वता कोणताही पुरावा हातात नसताना शिवसैनिकांची गर्दी करत वाट्टेल ते आरोप करण्याची प्रेस घेता. महाराष्ट्रातील सरकारमध्ये दिवसरात्र तमाशा सुरू आहे. लोकशाहीत सगळे समान तर ही विशेष वागणूक कशाला?'' असे उपाध्ये म्हणाले.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात की, ''महावसुली आघाडी सरकारने पोलिसांचा गैरवापर करीत विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला,तरी ना जनता शांत बसणार ना देवेंद्रजी भ्रष्ट्राचार काढण्याच थांबणार.'' या ट्विटसोबत त्यांनी आय सपोर्ट देवेंद्र असा हॅशटॅगही वापरला.

काय म्हणाले होते संजय राऊत?''कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?'' अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

 

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत