शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

“१६ वर्षांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 19:43 IST

Sachin Vaze: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांना भाजपकडून प्रत्युत्तरसचिन वाझे प्रकरणी भाजप जोरदार आक्रमकआरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच

मुंबई :सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून, यांच्या जागी आता हेमंत नगराळे (Hemant Nagrale) हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का, असा रोकडा सवाल केला आहे. (keshav upadhye criticised sanjay raut over sachin vaze issue)

केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. ''ही महान परंपरा राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्व नियम पायदळी तुडवत १६ वर्षानंतर सचिन वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत घेताना ही परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आल नाही का? चुकीच काम झाली तर वावटळीच वादळात रूपांतर जनताच करेल'', असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत

मुंबई  तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

"...या भ्रमात कोणीच राहू नये", परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता. त्यामुळे आता परमबीर सिंह यांचीच उचलबांगणी करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझेMumbai policeमुंबई पोलीस