शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 07:00 IST

बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बँकेची शाखा सुरू ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्याने आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.  

भरारी पथकाची तपासणी  आयोगाच्या भरारी पथकाने यासंदर्भातील तक्रारीनंतर त्याच रात्री बँकेच्या शाखेत जाऊन पाहणी केली असता, बँकेत ४० ते ५० जण असल्याचे आढळले होते.त्या अनुषंगाने बँकेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्यात काही लोक शाखा व्यस्थापकाच्या केबिनमध्ये आत-बाहेर करत असल्याचे आढळले.

टॅग्स :baramati-pcबारामतीAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४