शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

"काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष करायचा असेल तर..."; नाना पटोलेंचा महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:18 IST

Nana Patole Congress, Maharashtra Politics: नाना पटोलेंच्या जागी आज हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद

Nana Patole Congress, Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेसला अपयश आले. महाविकास आघाडीमध्ये एकत्र लढूनही काँग्रेसला मोठा पल्ला गाठता आला नाही. त्यानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. त्यांचा आज पदग्रहण सोहळाही पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नाना पटोले यांनी काँग्रेसला राज्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

काय म्हणाले नाना पटोले?

"मी चार वर्षात संघटनेला बळ देण्याचे काम केले. पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. विधानसभेत काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते पण भाजपाने मतांची चोरी करून सत्ता आणली. काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही, पण मतदान वाढले कसे याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली. आता आपल्याला पुढची लढाई लढाईची आहे. काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष करायचा असेल तर अफवांना बळी पडू नका, लोकांची कामे करत राहा. तरच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल," असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है! विरोधी पक्ष सक्षम नाही म्हणूनच भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले. काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे. कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देऊया आणि काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवूया. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवूया," असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रNana Patoleनाना पटोलेHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ