नजरकैदेत ठेवा, ईडी, मोका लावा, कांही फरक पडत नाही :राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:24 IST2019-08-23T15:20:26+5:302019-08-23T15:24:44+5:30
आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरतो, जनतेसाठी लढणे हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी, मोका, टाडा अशांनाही आमच्या मागे लावावे, आम्ही पण बघतोच, किती दिवस मुस्कटदाबी करणार ते. अशा खरमरीत भाषेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीला पोलिसांकडून आलेल्या नोटीशींचा समाचार घेतला.

नजरकैदेत ठेवा, ईडी, मोका लावा, कांही फरक पडत नाही :राजू शेट्टी
कोल्हापूर: आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरतो, जनतेसाठी लढणे हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी, मोका, टाडा अशांनाही आमच्या मागे लावावे, आम्ही पण बघतोच, किती दिवस मुस्कटदाबी करणार ते. अशा खरमरीत भाषेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीला पोलिसांकडून आलेल्या नोटीशींचा समाचार घेतला.
ऊस, दूधासह किमान हमी भावाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलने केली होती. त्या त्या वेळी कार्यकर्त्यांवर संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्याच गुन्ह्याच्या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्याकडून कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात तातडीने हजेरी लावण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सोलापूर, परभणी, नाशिक जिल्ह्यातील ५३ जणांना नोटीसा लागू झाल्या आहेत. उर्वरीत राज्यभरातही अशा नोटीसा निघण्याच्या मार्गावर आहेत.
हे जरा अति होतंय
सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावरची आंदोलने करणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यावरुन शेतकऱ्यांमध्येही संतप्त भावना आहेत. सरकारचे जरा अति होतंय अशा भावना उमटत आहेत. सत्तेच्या आधाराने कितीही दडपशाही केली तरी जनता त्याला चांगलेच प्रत्यूत्तर देईल असा विश्वास स्वाभिमानीचे कार्यकर्ते स्वस्तिक पाटील यांनी व्यक्त केला.