शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कौस्तुभच्या बलिदानाचा राजकीय वापर नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 05:13 IST

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या कुटुंबीयांना कोणाच्याही वैयक्तिक अर्थिक मदतीची आवश्यकता नाही.

सिंधुदुर्ग : शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या कुटुंबीयांना कोणाच्याही वैयक्तिक अर्थिक मदतीची आवश्यकता नाही. त्यामुळे कुटुंबीयांना अर्थिक मदत करण्याऐवजी जर इच्छा असेलच तर ती रक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला किंवा सामाजिक संस्थेला द्यावी. तसेच शहीद कौस्तुभचे शौर्य व त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा कोणीही स्वत:च्या फायद्यासाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये, असे आवाहन शहीद मेजर कौस्तुभ यांचे चुलत काका विजय रावराणे यांनी पुन्हा एकदा वैभववाडीतील पत्रकार परिषदेत केले आहे.वैभववाडी येथील भैरी भवानी प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयात रावराणे यांनी पत्रकार परिषद घेतली या वेळी बंडू मुंडल्ये उपस्थित होते. रावराणे पुढे म्हणाले, कणकवलीतील दहीहंडी रद्द करून दहीहंडीची रक्कम शहीद मेजर कौस्तुभ रावराणेंच्या कुटुंबाला देण्यात येणार असल्याचे काही लोकांनी जाहीर केले. तसे वृत्त आमच्या वाचनात आले. परंतु, कौस्तुभच्या अंत्यविधीनंतर सोशल मीडियातून मदतीचे मेसेज पसरू लागताच अर्थिक मदतीसंदर्भात आम्ही भूमिका स्पष्ट केली होती. तरीही पुन्हा अर्थिक मदतीचा विषय पुढे आला आहे. आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो. परंतु, कोणाचीही वैयक्तिक मदत आम्हाला नको.ते म्हणाले, ‘शहीद मेजर कौस्तुभ यांच्या बलिदानाचा कोणीही स्वत:च्या फायद्यासाठी तसेच राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये, अशी आम्हा कुटुंबीयांकडून सर्वांना विनंती आहे. ज्या कोणाला मदत द्यावयाचीच असल्यास त्या पैशातून हवीतर सैनिक अ‍ॅकॅडमी सुरू करून जिल्ह्यातील तरुणांना सैन्य भरतीचे प्रशिक्षण द्यावे. किंवा गोरगरीब विद्यार्थी, गरजू रुग्णांना अथवा एखाद्या सामाजिक संस्थेला मदत द्यावी. त्याला आमचा विरोध असणार नाही. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.>नीतेश राणे यांच्या भावनांचाही आदरच'शासनाकडून शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबाला मदत मिळणारच आहे. त्यामुळे इतरांकडून येणाऱ्या मदतीतून एखादे सामाजिक कार्य झाल्यास आम्हाला आवडेल. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या भावनांचाही आदर करतो. परंतु बलिदानाचे राजकारण आम्हाला होऊ द्यायचे नाही. त्यामुळे त्यांनी देऊ केलेली मदत आम्हाला नको, तसेच यापुढे कोणीही अशा प्रकारे कौस्तुभच्या कुटुंबाला मदत करण्याचे जाहीर करू नये. आम्ही ती स्वीकारणार नाही, असे रावराणे यांनी स्पष्ट केले़

टॅग्स :Kaustubh Raneकौस्तुभ राणे