शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षेतही कर्नाटक नंबर वन

By admin | Updated: June 10, 2015 02:08 IST

कर्नाटकात दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यात निकालही लागला. नापास विद्यार्थ्यांसाठी १५ ते २२ जूनअखेर पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे.

भीमगोंडा देसाई, कोल्हापूरकर्नाटकात दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यात निकालही लागला. नापास विद्यार्थ्यांसाठी १५ ते २२ जूनअखेर पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. पुरवणी परीक्षेत पास झाल्यानंतर नियमित विद्यार्थ्यांसोबत पुढील वर्गात बसता येणार आहे. त्यामुळे निकालाबरोबरच पुरवणी परीक्षा घेण्याची कर्नाटक माध्यमिक परीक्षा मंडळाची १४ वर्षांची परंपरा कायम राखली आहे. मंडळाने केलेल्या दाव्याप्रमाणे वेळेत निकाल लावून पुरवणी परीक्षा घेण्यातील ‘नंबर वन’ यंदाही राखला आहे. कर्नाटकात माध्यमिक परीक्षा मंडळाने यंदा दहावीची परीक्षा ३० मार्च ते १३ एप्रिलअखेर घेतली. या परीक्षेला राज्यातून साडेआठ लाख विद्यार्थी बसले होते. निकाल १२ मे रोजी लावला. केवळ ३० दिवसांत निकाल लागला. वेळेत निकाल लागल्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. १५ जूनपासून नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. यामुळे मुख्य परीक्षेसाठी केलेला अभ्यास विस्मृतीत जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देता येणार आहे. कर्नाटकात विभागनिहाय पेपर तपासणीसाठी तात्पुरती केंदे्र निर्माण केली जातात, हे वेळेत निकाल लागण्याचे महत्त्वाचे कारण आहे. महाराष्ट्रात शिक्षकांना शाळेत उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या जातात. बहुतांश शिक्षक शाळेत वेळ मिळत नाही म्हणून त्या घरी घेऊन जातात. परिणामी उत्तरपत्रिका तपासणीसाठी विलंब लागतो. निकालही उशिरानेच जाहीर होतो. पारदर्शकता राहत नाही. निकाल जितक्या लवकर जाहीर होईल, तितका अधिक वेळ विद्यार्थी व पालक यांना पुढील करिअरची, अभ्यासक्रमांची दिशा ठरवून शिक्षण संस्था निवडण्यासाठी मिळतो. निकाल काय लागणार यासंबंधी विद्यार्थ्यांचा तणावाचा कालावधी कमी होतो. म्हणून निकाल लवकर लागावा, अशी पालक व विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. प्रत्येक वर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रात दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे एकाच महिन्यात होत असते. अचूक नियोजनाअभावी महाराष्ट्रात वेळेवर निकाल लागत नाहीत. याउलट कर्नाटक परीक्षा मंडळाच्या प्रशासनाने वेळेत निकाल लावण्यातील आघाडी कायम राखली आहे. कर्नाटक परीक्षा मंडळाचा आदर्श घेऊन, महाराष्ट्रातही आता वेळेत निकाल लावून, पुढील वर्षापासून दहावी आणि बारावी परीक्षांतील नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नापास विद्यार्थ्यांना वर्ष वाया न घालविता पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव...दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात पुरवणी परीक्षा कशी व केव्हा घेतली जाते, यंत्रणा कशी राबविली जाते, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतो, याबाबत ‘लोकमत’ने मालिका प्रसिद्ध केली. त्यामुळेच महाराष्ट्रातही पुरवणी परीक्षेचा निर्णय झाला. त्याबद्दल ‘लोकमत’चे मंगळवारी दिवसभर अनेकांनी अभिनंदन केले.