शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

धक्कादायक! जमिनीचा ताबा घेण्यासाठी कर्नलने गावात आणले लष्करी जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 20:57 IST

खेड पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड व भरणे यांनी परपस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देयाबाबत खेड पोलिस ठाण्यात अदयापही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही..

राजगुरूनगर (दावडी) : खेड तालुक्यातील गुळाणी येथे एका लष्करी कर्नलने जमिनीचा ताबा घेण्यासाठी चक्क ५० ते ६० जवान आणल्याची घटना घडली आहे. ३ तास लष्करी जवानांची दहशत गावात  दहशत होती. जमिनीचा ताबा घेण्यासाठी कर्नल केदार गायकवाड यांनी गावात लष्करी जवान आणले.

याबाबात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळाणी येथील परिमल विजय गायकवाड यांच्या कुटुंबातील काही व्यक्तीनी वारस हक्कांनी मिळालेली जमीन दिलीप नामदेव भरणे ( रा. मुळशी ) यांना सन २०१८ विकली होती. मात्र, गायकवाड कुटुंबियांनी ही जमीन आमची आहे म्हणून या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. सध्या दावा दिवाणी न्यायालयात सुरू आहे.

भरणे यांनी १५ जुन रोजी शेतात नागरणीसाठी टॅक्टर घातला असता टॅक्टर ड्रायवर गणेश बाळासाहेब गाडे याला गायकवाड कुंटुबियांनी बेदम मारहाण केली होती. तसेच भरणे यांनी आम्हाला धमकावले याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड व भरणे यांनी परपस्परविरोधी फिर्याद दिली होती. या बाबत खेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अरविंद चौधरी व सहाय्यक उपनिरिक्षक निलेश बडाख या घटनेचा तपास कार्य होते. आज (दि. २२ ) रोजी सकाळी ११ वाजता परिमल गायकवाड यांचा भाऊ कर्नल केदार विजय गायकवाड यांनी गुळाणी गावात लष्करी चार गाडया आणुन त्यामध्ये ५० ते ६० लष्करी जवान हत्यार सह घेउन आले. भरणे यांनी घेतलेली शेतजमिन लष्करी जवानांने वेढा देऊन चार टॅक्टर जमिनीत घालून शेत नांगरुन घेतले. सुमारे ३ ते ४या तास या घटनेमुळे दहशत पसरली होती. दरम्यान, एक सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी तिथे गेला असता हा काय प्रकार आहे, असे विचारले असता. जवानांनी तुम्ही कोण असा प्रतिप्रश्न केला. मात्र सेवानिवृत्त स्वत: चे आय कार्ड दाखविल्यावर लष्करी जवानांसह कर्नल गायकवाड यांनी गुळाणी गावातुन पळ काढला.. याबाबत खेड पोलिस ठाण्यात अदयापही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. गावात दहशत निर्माण या घटनेबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.

........................................................................याबाबत खेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना या घटनेबाबत विचारले असता ही घटना खरी आहे. मात्र, तक्रार देण्यास कोणीही आले नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता सीआरपी कलम १४९न्वे राखण्यासाठी तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. त्यावर तात्काळ तहसिलदार सुचित्रा आमले यांनी  भरणे व गायकवाड यांना या गुळाणी येथील शेतजमिनीत जाण्यास मनाई आदेश लागु केला आहे. 

टॅग्स :KhedखेडIndian Armyभारतीय जवानFarmerशेतकरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी