शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

‘कर्मोलोदया’ला अनुदान मिळाले

By admin | Updated: August 26, 2016 01:09 IST

शासकीय विशेष मुलींच्या वसतिगृहात चालवणाऱ्या ‘कर्मोलोदया’ या संस्थेच्या खात्यात अखेर गुरुवारी दुपारी १९ लाखांचे अनुदान जमा झाले.

पुणे : येथील शासकीय विशेष मुलींच्या वसतिगृहात चालवणाऱ्या ‘कर्मोलोदया’ या संस्थेच्या खात्यात अखेर गुरुवारी दुपारी १९ लाखांचे अनुदान जमा झाले. ‘लोकमत’ने ‘कर्मोलोदया’ची व्यथा गुरुवारी मांडली होती. त्यानंतर लगेच हे अनुदान जमा करण्यात आले. गेल्या दीड वर्षाचे अनुदान मिळालेले नव्हते. १४ कर्मचाऱ्यांना पगार देता आला नसून, शासनाच्या या भूमिकेमुळे कर्मोलोदयाचे व्यवस्थापन हतबल झाले होते. आता गेल्या वर्षीच्या २८ लाख थकीत अनुदानापैैकी १९ लाख मिळाले असून, ९ लाख बाकी आहेत. वसतिगृहात ५२ विशेष मुली असून, कर्मोलोदया ही एनजीओ मुलींचे १९९७ पासून संगोपन करीत आहे. गेल्या तीन दिवसांत या मुलींपैकी चार मुलींना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेच्या एक सिस्टर विनया यांच्या मेंदूत ताप गेल्याने त्यादेखील गेल्या आठवड्यापासून आयसीयूमध्ये आहेत. मृत्यूशी झुंज देणारी सहकारी तसेच डेंगीची लागण झालेल्या मुली पाहून या वसतिगृहाच्या अधीक्षिका सिस्टर डोमीनी यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून, आतातरी अनुदान द्या, अशी विनंती केली. मात्र, आश्वासनापलीकडे त्यांना काहीच मिळाले नव्हते. ‘कर्मोलोदया’ संस्था या ५२ मुलींचे संगोपन अगदी आईवडिलांप्रमाणे करीत आहे. सर्व कर्मचारी या मुलींना जीव लावतात. मात्र, या कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली होती.याबाबत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी शीला भरते यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या ‘‘१९ लाखांचे अनुदान संस्थेच्या खात्यात जमा केले आहे. गेल्यावर्षी पुरेसे अनुदान मिळाले नव्हते. ३१ मार्चला जे काही मिळाले ते या संस्थेला देण्याइतपत पैैसे नव्हते. त्यामुळे अनुदान बाकी होते. आता जेवढे अनुदान आले ते सर्व या संस्थेला दिले आहे. जिल्ह्यात एकच बालगृह असून, प्रथम त्यांना अनुदान द्यावे असे कोर्टाचे आदेश आहेत. त्यामुळे त्यांना शासनाकडून मिळलेले सर्व अनुदान दिले आहे. उर्वरित रक्कम आम्ही शासनाकडे मागत आहोत.’’ (वार्ताहर)>वसतिगृहाच्या अधीक्षिका सिस्टर डोमीनी यांच्याशी संपर्क साधला असता, या म्हणाल्या ‘‘कालपर्र्यंत आम्ही समाजकल्याणकडे पाठपुरावा करत होता. मात्र अनुदान मिळाले नाही. आज १९ लाख अनुदान मिळाले आहे. गेल्यावर्षीचे २८ लाख बाकी होते. त्यातील १९ लाख मिळाले असून, त्यातून कर्मचाऱ्यांचे थकलेले सहा महिन्यांचे पगार देता येतील. तसेच खर्चासाठी घेतलेली उचलही परत करता येईल.’’ लोकमतने वारंवार पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.