शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी, कंगना रनौतवर गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची १२ तासांच्या आत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 04:49 IST

कंगना व रंगोलीवर आयपीसी कलम १५३ (ए), २९५ (ए) १२४ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सय्यद यांनी केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके)करून लोकांना भडकावले. (Kangana Ranaut)

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश वांद्रे न्यायालयाने दिल्यानंतर १२ तासांच्या आत पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला. कंगना व तिची बहीण रंगोली यांनी टिष्ट्वटरवर पोस्ट टाकून हिंदू व मुस्लीम समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर मुन्नावरली सय्यद यांनी केला. बाबत वांद्रे दंडाधिकारी न्यायलयात त्यांनी तक्रार केली होती.

या तक्रारीत दोघींनी टिष्ट्वटर आणि मुलाखतीमध्ये केलेल्या विधानावरून आरोप करण्यात आले. तज्ज्ञांकडून याबाबत तपास करणे आवश्यक आहे, असे दंडाधिकारी जयदेव खुले यांनी आदेशात म्हटले होते.

पोस्टमागे हेतू तपासणे आवश्यक - कंगना व रंगोलीवर आयपीसी कलम १५३ (ए), २९५ (ए) १२४ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सय्यद यांनी केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके)करून लोकांना भडकावले. अशी पोस्ट करण्यामागे कंगनाचा मूळ हेतू काय आहे, याचा तपास करणे आवश्यक आहे, असे सय्यद यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

ट्विटरवरून केले होते पोलिसांना लक्ष्य -सुशांतने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने टिष्ट्वट करून बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका केली होती. तसेच याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस नीट करत नसल्याचा आरोप करून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तसेच त्यावरून शिवसेनेलाही लक्ष्य केले होते.

बंगल्यासंदर्भातील केलेल्या याचिकेवर निकाल राखूनदरम्यान, कंगनाने तिच्या पाली हिल येथील बंगल्यावर पालिकेने कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

महाराष्ट्र पोलीस बॉलीवूडच्या पाठीशी - गृहमंत्रीबॉलीवूडमधल्या काही जणांचा ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. पण त्यांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूड ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकविणे योग्य नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवूडची बदनामी करता येणार नाही. महाराष्ट्र पोलीस सदैव बॉलीवूडच्या पाठीशी आहे. मात्र, ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकल्यास कारवाई होणारच, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतCourtन्यायालयPoliceपोलिसHinduहिंदूMuslimमुस्लीम