कामबंद आंदोलनाने ग्रा.पं.चा कारभार ठप्प

By Admin | Updated: July 4, 2014 00:02 IST2014-07-03T23:39:16+5:302014-07-04T00:02:16+5:30

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांच्या शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

Kambandh agitation has taken over the control of Grampanchayat | कामबंद आंदोलनाने ग्रा.पं.चा कारभार ठप्प

कामबंद आंदोलनाने ग्रा.पं.चा कारभार ठप्प

वाशिम : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांच्या शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.यामुळे जिल्ह्यातील ४९३ ग्रामपंचायतींपैकी ४५७ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे.
ग्रामविकास अधिकार्‍यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी,मग्रारोहयोकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारावी,१0 ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी नेमण्यात यावा,प्रवास भत्ता तीन हजार रुपये करण्यात यावा,कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करण्यात यावे,विनाचौकशी निलंबन थांबवावे,मग्रारोहयोच्या कामांची एकतर्फी चौकशी व वसुली बंद करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकुण ग्रामसेवकांची ३0३ पदे मंजूर असली तरी त्यातील २९७ पदे भरलेली आहेत.त्यापैकी ३६ कंत्राटी ग्रामसेवक आहेत.सहा पदे रिक्त आहेत.ग्रामविकास अधिकार्‍यांची ५५ पदे मंजूर असलीतरी त्यापैकी ४१ पदे भरलेली आहेत.तब्बल १४ पदे रिक्त आहेत.जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांअंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांपैकी कंत्राटी ग्रामसेवक वगळता अन्य ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतींच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकार्‍यांना सुपुर्द केले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे.
यात कारंजालाड तालुक्यात १३५ गावातंर्गत ९१ ग्रा.पं.चे ५३ ग्रामसेवक व ७ ग्रामविस्तार अधिकारी असे एकूण ६0 ग्रामसेवक कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.बहुतांश ग्रामसेवक आंदोलनात सहभागी असल्याची माहिती ग्रामसेवक संघटना युनियनचे अध्यक्ष साही चव्हाण, उपाध्यक्ष बी.आर.चव्हाण, सचिव डी.जे.निंघोट यांनी दिली. मानोरा तालुक्यातील तालुक्याचा ११३ गावाचा गाडा ७८ ग्रा.पं.च्या माध्यमातून चालविला जातो.तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांनी तालुकास्तरावर ग्रा.पं.च्या चाब्या व शिक्के गटविकास अधिकार्‍याकडे सुपूर्द केले. मानोरा पं.स.प्रशासनाने काल चाब्या व शिक्के घेण्यास नकार दिला होता. त्याबाबत ३ जुलै रोजी मानोरा गटविकास अधिकारी डॉ.विनय वानखडे पुण्यावरून आले असता ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी जिल्हाभर विचारणा करून इतर पं.स.प्रमाणे मानोरा पं.स.ने देखील चाब्या व शिक्के घ्यावयास पाहिजे होते हे लक्षात आणून दिले. तेव्हा वानखडे यांनी तालुक्यातील ७८ ग्रा.पं.च्या कपाटाच्या चाब्या व शिक्के शिलबंद करून आवक जावकमध्ये देण्यास ग्रामसेवकांना सांगीतले.
मंगरूळपीर तालुक्यातील७६ ग्रामपंचायतीत काम करणारे ३ ग्रामविकास अधिकारी,४३ ग्रामसेवकांपैकी ४0 ग्रामसेवक कामबंद आंदोलनात सहभागी आहेत.३ ग्रामसेवक कंत्राटी असल्याने ते यात सहभागी नाहीत.ग्रामसेवक संपावर गेल्यावर चाब्या आणि शिक्के गटविकास अधिकार्‍यांच्या ताब्यात दिले आहेत.बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झालेले ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालयासमोर ठाण मांडून बसले असल्याचे दिसून आले. मालेगाव तालुक्यात ग्रामसेवक कर्मचारी युनियनच्या वतीने २ जुलैपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाचा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींना फटका बसला आहे.विविध प्रमाणपत्रे ,दाखले देणे,मोजमापे घेणे यासह विविध विकास कामे व दैनंदिन कामे होत नसल्यामुळे नागरिक अडचणीत आले आहेत.या आंदोलनात तालुक्यातील ४७ ग्रामसेवक व ७ ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले आहेत.हे आंदोलन मालेगाव तालुक्यात मालेगाव ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष ए.आर.पायघन,उपाध्यक्ष सुनील इडोळ,सचिव सी.एस.पायघन यांच्या नेतृत्वात होत आहे.
वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींपैकी ८१ ग्रामपंचायतींना ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा फटका बसत आहे.तालक्यातील ८४ ग्रामपंचायतींसाठी कार्यरत असलेल्या ६0 ग्रामसेवकांपैकी तिघेजण कंत्राटी आहेत. ते या आंदोलनात सहभागी झालेले नाहीत.उर्वरीत ५७ ग्रामसेवकांनी त्यांच्याकडे कारभार असलेल्या ८१ ग्रामपंचायतींच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकार्‍यांना ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोपविल्या.रिसोड तालुक्यात ८0 ग्रामपंचायती आहेत.त्यामध्ये ४६ ग्रामसेवक कार्यरत असून त्यापैकी ४२ ग्रामसेवक ,८ ग्रामविकास अधिकार्‍यांनी ग्रामपंचायतींच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकार्‍यांना सुपुर्द करुन २ जुलैपासून बेमुदत कामाबंद आंदोलन सुरू केले आहे.या तालुक्यात ४ ग्रामसेवक रजेवर असून ४ ग्रामसेवक कंत्राटी आहेत.

Web Title: Kambandh agitation has taken over the control of Grampanchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.