कल्याणमध्ये व्यापा-याच्या मुलाची अपहरण करुन हत्या

By Admin | Updated: March 3, 2016 14:05 IST2016-03-03T14:05:30+5:302016-03-03T14:05:30+5:30

व्यापा-याच्या नोकरांनीच नयन जैन या 8 वर्षीय मुलाचं अपहरण करुन हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे

In Kalyan, the son of Vipa's son was kidnapped and murdered | कल्याणमध्ये व्यापा-याच्या मुलाची अपहरण करुन हत्या

कल्याणमध्ये व्यापा-याच्या मुलाची अपहरण करुन हत्या

>ऑनलाइन लोकमत - 
कल्याण, दि. ३ - व्यापा-याच्या नोकरांनीच नयन जैन या 8 वर्षीय मुलाचं अपहरण करुन हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. नयन जैन हा कल्याण येथील एका व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचं काल अपहरण झालं होतं. अपहरणकर्त्यांनी 15 लाखांची खंडणीदेखील मागितली होती. नयन जैनच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना 15 लाख देखील दिले. मात्र तरीही अपहरणकर्त्यांनी नयन जैन याची हत्या केली. मुरबाड तालुक्यातील शिवळे गावात खाटेघर नदीच्या पुलाखाली आज नयन जैनचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी राजेंद मोरे,विजय दुबे व खुशवाह या तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. 
 

Web Title: In Kalyan, the son of Vipa's son was kidnapped and murdered