कल्याणमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, १ ठार
By Admin | Updated: July 25, 2016 09:10 IST2016-07-25T09:08:07+5:302016-07-25T09:10:12+5:30
कल्याणच्या आधारवाडी परिसरात एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन १महिला ठार १२ जखमी झाले.

कल्याणमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, १ ठार
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २५ - कल्याणच्या आधारवाडी परिसरात एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन १ महिला ठार झाली आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. आधारवाडी परिसरातील रमाबाई नगर येथे सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. यामध्ये ताराबाई गायकवाड या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रमाबाई नगर परिसरातील बैठ्या चाळीतील सलीम सय्यद यांच्या घरात हा स्फोट झाला व एकच हल्लाकोळ माजला. दरम्यान सलीम शेख व रिहाना शेख हे दोघे अत्यंत गंभीर असून त्यांच्यासह ९ जखमींना उपचारांसाठी सायनला हलवण्यात आले आहे.