शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

“करप्शन आणि कन्फ्युजनची युती; सरड्यालाही लाज वाटेल असे रंग बदलले”, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर नाव घेता टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:14 IST

Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026: सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काही लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली असून, सरड्यालाही लाज वाटेल असे रंग बदलले आहेत. जनतेला हे सर्व स्पष्टपणे दिसत असून अशा दुटप्पी भूमिकेला योग्य वेळी उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

कल्याण - कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम येथे घेतलेल्या दोन जाहीर सभांत विरोधकांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला.  उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काही लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली असून, सरड्यालाही लाज वाटेल असे रंग बदलले आहेत. जनतेला हे सर्व स्पष्टपणे दिसत असून अशा दुटप्पी भूमिकेला योग्य वेळी उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर जोरदार टीका केली. “ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. गोंधळलेल्या आणि दिशाहीन लोकांचीच ही युती आहे. त्यांच्या युतीत काहीतरी ‘केमिकल लोचा’ झाला आहे,” अशी खरमरी टीका त्यांनी केली.

कल्याण–डोंबिवली महापालिकेत मोठ्या प्रमाणावर जागा बिनविरोध झाल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत, असे सांगत शिंदे म्हणाले, “तुमच्याकडे लढवायला उमेदवारच नाहीत, त्यात आमचा काय दोष?” जिंकले की निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि मतदारयादी सगळे चांगले वाटतात आणि हरले की त्यावरच आरोप केले जातात, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. जनता जनार्दन सर्व काही जाणते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही सभांत ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत शिंदे यांनी सांगितले की, या योजनेमुळे महिलांच्या खात्यात दरवर्षी सुमारे ४५ हजार कोटी रुपये थेट जमा होत असून महिलांना आर्थिक स्वावलंबन व आत्मसन्मान मिळत आहे. महिलांना स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार मिळाला असून ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण कोणालाही घाबरत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कल्याण पूर्व आणि पश्चिम परिसरात झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेताना शिंदे यांनी मेट्रो प्रकल्प, उन्नत मार्ग, खाडी पूल, ऐरोली–काटई नाका उन्नत मार्ग, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कल्याण रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण, तसेच क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा उल्लेख केला. कर्करोग रुग्णालय, जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल, टाटा टेक्नॉलॉजीज स्किल सेंटरसारखे प्रकल्प शहराच्या विकासाला नवी दिशा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण–डोंबिवलीच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की, काही लोक घरबसल्या किंवा फेसबुक लाईव्हवरून सरकार चालवत असल्याचा दावा करतात, मात्र आम्ही रस्त्यावर उतरून लोकांच्या समस्या सोडवतो. आमचा डोळा तिजोरीवर नसून विकासावर आहे. टीकेला आरोपांनी नव्हे तर कामाने उत्तर देण्याची आमची भूमिका आहे, असेही त्यांनी  सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde slams Thackeray, calls alliance 'corruption and confusion', a chameleon change.

Web Summary : Eknath Shinde criticized Uddhav Thackeray for betraying Balasaheb's ideals for power. He called the alliance a 'corruption and confusion' and highlighted development works in Kalyan-Dombivli, including the 'Ladki Bahin' scheme. Shinde emphasized his government's focus on development over personal gain, contrasting it with critics' online governance claims.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे