राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले असून, स्वयंघोषित महाराजांच्या कृत्यांवरून कालीचरण महाराज यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने अशोक खरातसारख्या लोकांना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजेत, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
धाराशिव येथील एका खाजगी कार्यक्रमात बोलताना कालीचरण महाराज यांनी अशोक खरात याच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, "जे खरे आहे, त्याचीच नक्कल केली जाते. परंतु, नक्कल करतोय याचा अर्थ असा नाही की ते खरे आहेत. जे लोक अशा प्रकारे धर्माचा मुखवटा घालून चुकीची कृत्ये करतात आणि ज्यांच्यावर आरोप सिद्ध होतात, त्यांना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजेत. लोक श्रद्धेपोटी कोणालाही महाराज मानतात, पण जर असे लोक धर्माला कलंक लावत असतील तर ते 'पापी' आहेत. चुकीच्या कृत्यांचे फळ त्यांना नक्कीच मिळेल", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या अशोक खरात याच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात खरात याच्याकडील एका पेनड्रायव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. या प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
या प्रकरणातील गांभीर्य आणि पीडितांची संख्या लक्षात घेता, राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डॅशिंग महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नेतृत्वाखाली एसआयटी पथक याप्रकरणाची चौकशी करेल. या प्रकरणातील सर्व ५८ व्हिडिओंची सत्यता पडताळणे, पीडितांचे जबाब नोंदवणे आणि खरात याच्या कृत्यामागील संपूर्ण साखळी उघड करणे, हा त्यांचा मुख्य उद्धेश असेल.
Web Summary : Kali Charan Maharaj demands public execution for Ashok Kharat following rape allegations. A SIT, led by Tejaswini Satpute, will investigate the case involving 58 objectionable videos. The scandal led to resignation of Women's Commission head.
Web Summary : बलात्कार के आरोपों के बाद कालीचरण महाराज ने अशोक खरात को सार्वजनिक रूप से फांसी देने की मांग की। तेजस्विनी सातपुते के नेतृत्व में एसआईटी 58 आपत्तिजनक वीडियो वाले मामले की जांच करेगी। इस घोटाले से महिला आयोग की प्रमुख का इस्तीफा हो गया।