शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? हा कोण? सर्वत्र शोधाशोध आणि चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 08:58 IST

Who is Kadaknath Mumbaikar: राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही सामनामध्ये त्यांच्या नावाचा साप्ताहिक लेख छापून आला होता. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने सामनाच्या साप्ताहिक लेखाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते.

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर सामनातील त्यांचे लेख कोण लिहितो याच्या मागे देखील ईडी लागली होती. राऊत जेलमध्ये असले तरी त्यांचे लेख कसे छापून येतात? तुरुंगातून ते कसे पाठवू शकतात याचे कोडे उलगडण्याच्या प्रयत्नात ईडी असताना एक महत्वाची माहिती हाती आली आहे. 

राऊतांचे साप्ताहिक लेख आता कडकनाथ मुंबईकर लिहित आहे. हा कडकनाथ मुंबईकर कोण? याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत तुरुंगात गेल्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सामनाची धुरा हाती घेतली आहे. गेल्याच आठवड्यातील सामनातील संजय राऊतांचा लेख हा कडकनाथ मुंबईकर या नावाने लिहून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण कडकनाथ मुंबईकर हे नाव सर्वांनाच नवखे होते. आता हा नवा गृहस्थ कोण अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सामनामध्ये अचानक कडकनाथ मुंबईकर कोण आला, हे पाहण्यासाठी सामनाच्या कार्यालयात विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा करण्यास किंवा माहिती देण्यास नकार दिला. हा उद्धव ठाकरेंचा विशेषाधिकार आहे, असे ते म्हणाले. मात्र, सूत्रांनुसार कडकनाथ मुंबईकर हे नाव साप्ताहिक कॉलमसाठी वापरण्यात आलेले एक पात्र आहे. 

राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही सामनामध्ये त्यांच्या नावाचा साप्ताहिक लेख छापून आला होता. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने सामनाच्या साप्ताहिक लेखाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. राऊत दर रविवारी 'रोकठोक' हे सदर लिहितात. राऊत यांना कोठडीत संपादकीय किंवा लेख लिहिण्याची परवानगी नाही. तसेच या लेखामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राऊतांच्या अटकेनंतरची विधाने, घटनांचा संदर्भ होता. यामुळे हे लेख कोण लिहितोय, याची चौकशी ईडी करत आहे. कोठडीत असताना राऊत यांनी स्वत: कॉलम लिहिला की कुणाला तपशील दिला की सामनाच्या कर्मचार्‍यांनी राऊत यांच्या नावाने लिहीले? त्यामुळेच रविवारच्या 'कडकनाथ मुंबईकर'च्या बायलाईनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे