शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

बस नागपूरची, क्रमांक मात्र मध्य प्रदेशचा

By admin | Updated: February 3, 2015 00:58 IST

गोंदियातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या स्कूल बस कंत्राटदाराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे चालविण्यात येणाऱ्या दुसऱ्या ‘स्कूल बस’चा क्रमांकही बोगस असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

बल्लारपुरातील प्रकरण : दुसऱ्या गाडीचा क्रमांकही बोगस!गोंदिया : गोंदियातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या स्कूल बस कंत्राटदाराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे चालविण्यात येणाऱ्या दुसऱ्या ‘स्कूल बस’चा क्रमांकही बोगस असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. बल्लारपूर पोलिसांच्या पथकाने केलेल्या तपासात मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचा पासिंग क्रमांक टाकलेली दुसरी बस प्रत्यक्षात नागपूर ग्रामीण परिवहन विभागाने पासिंग केलेली निघाली. त्यामुळे सदर कंत्राटदावर दुहेरी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. शिवाय बोगस कागदपत्रे सादर करून सदर बसचा करार वेकोलिसोबत स्कूलबससाठी केल्याने सदर बस मालकाने वेकोलिचीही फसवणूक केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गाड्यांवर बनावट नंबरप्लेट टाकून चालविल्या जात असलेल्या गाड्यांची ही बनवाबनवी ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर उघडकीस आली. आधी सावरासावर करणाऱ्या बल्लारपूर पोलिसांनी नंतर मात्र गांभीर्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला. गोंदियात अधिकृतपणे नोंदणी असलेल्या एमएच ३५, के ३८६६ ही बस गोंदियात स्कूल बस म्हणून धावत असताना हाच क्रमांक दुसऱ्याच एका गाडीवर टाकून बल्लारपूरमध्ये वेस्टर्न कोलफील्ड लि.मध्ये पांढऱ्या रंगाची एक बस चालत होती. गोंदिया परिवहन विभागातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्याबाबतची खात्री बल्लारपूर पोलिसांनी करून घेतल्यानंतर बल्लारपूरमधील वरील क्रमांकाने चालणाऱ्या बसवरील क्रमांक बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यासोबतच चंद्रपूर आरटीओने एमपी २८/ पी ०२४७ या क्रमांकाच्या बसचा चेसिस व इंजिन क्रमांक तपासला. त्यावेळी तिथे पट्टीच्या खाली पुसटपणे ‘एमएच ४०’ हा क्रमांक दिसला. त्यामुळे ती गाडी मध्य प्रदेश पासिंगची नसून नागपूर ग्रामीणमधून पासिंग झालेली असण्याचा संशय पोलिसांना आला. मात्र बस मालकाने या बसवर मध्यप्रदेश पासिंगच्या नंबरप्लेटचे स्टिकर चिकटविले होते.सहायक पोलीस निरीक्षक सिंगनजुडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी (दि.२) नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालय गाठून त्या गाडीचा चेसिस व इंजिन क्रमांक तपासला असता त्या गाडीचा क्रमांक ‘एमएच ४०/ ७४६४’ असा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही गाडीसुद्धा बनावट क्रमांक टाकून चालविली जात होती, हे स्पष्ट झाले.दरम्यान, गोंदियात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्कूल बस म्हणून चालत असलेली एमएच ३५, के ३८६६ क्रमांकाची गाडी बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन ती पोद्दार स्कूलमध्येच ठेवली आहे. पोलिसांच्या सूचनेशिवाय त्या गाडीला रस्त्यावर धावता येणार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)