शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

तयार रहा! थोड्याच वेळात आकाशात दिसणार अद्भूत नजारा; गुरू-शनी ग्रह घेणार गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 18:50 IST

Jupiter and Saturn conjunction: नैऋत्य दिशेला हे दोन ग्रह अशा कोणात दिसणार आहेत की वाटेल ते एकमेकांची गळाभेट घेत आहेत. हा योगायोग मकर राशीमध्ये होत आहे.

आज सायंकाळी सुर्यास्तानंतर आकाशात एक अद्भूत नजारा दिसणार आहे. हा योग तब्बल ८०० वर्षांनी जुळून आला आहे. संध्याकाळी ७.३० ते ७.५० या काळात सूर्यमालेतील सर्वात मोठाग्रह गुरु आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. आयुष्यात पुन्हा अशी संधी येणार नाही, कारण य़ानंतर हे ग्रह शेकडो वर्षांनी एकत्र येतील. याच कारणामुळे आज गुगलने देखील डुडल बनविले आहे. 

नैऋत्य दिशेला हे दोन ग्रह अशा कोणात दिसणार आहेत की वाटेल ते एकमेकांची गळाभेट घेत आहेत. हा योगायोग मकर राशीमध्ये होत आहे. तुम्ही या दोन ग्रहांचे मिलन तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहात. जानेवारीमध्ये मकर राशीमध्ये शनी प्रवेश करणार आहे. नोव्हेंबरमध्ये गुरु ग्रह मकर राशीमध्ये आला आहे.

याला ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात गुरु व शनि है दौन ग्रह यापूर्वी १२२६ आणि १६२३ मध्ये जवळ आले होते. त्यानंतर आता २१ डिसेंबर २०२० रोजी दोन ग्रह कमी अतरावर येण्याची दुर्मीळ खगोलीय योग आला आहे. 

पृथ्वीवरून अगदी ०.१ डिग्री अंतरावर दोन्ही ग्रहांना एकाचवेळी निरीक्षण व अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. वीस वर्षांपूर्वी हे परस्परांचे जवळ आले होते.शनि सुमारे १२ डिग्री आणि गुरु ३० डिग्रीपर्वत पृथ्वीवरील वर्षात प्रवास करेल. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी १८ डिग्री जवळ येतील आणि जवळ येण्यास २० वर्षे लागतील शनि आणि गुरूमधील अंतर ७३० दशलक्ष दिवस  किलोमीटर आहे . शेवटच्या वेळी म्हणजेच २८ मे २००० रोजी है अंतर १.२५ डिग्री होते. 

कन्झिकेशन्स म्हणजे काय ? कन्झिकेशन्स म्हणजे जेव्हा दोन वस्तू आकाशात एकमेकाच्या जवळ दिसतात. गुरु आणि शनि यांचा एक कन्झिकेशन्स- दर २० वर्षांतून एकदाच घडले- याला एक ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात.

या संपूर्ण खगोलीय घटनेचा आपण आपल्या कुटुबासमवेत आनंद घ्यावा, यापूर्वी १२२६ व १६२३ मध्ये अशा प्रकारची दुर्मिळ खगोलीय घडलेली होती, ही आपणास डोळ्यांनी देखील पाहता येते. नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल.- राहुल दास, संग्रहालय अभिरक्षक, सोलापूर विज्ञान केंद्र

टॅग्स :Astrologyफलज्योतिष