जुंदालला मंगळवारी शिक्षा होणार

By Admin | Updated: July 31, 2016 04:43 IST2016-07-31T04:43:18+5:302016-07-31T04:43:18+5:30

लष्कर-ए- तय्यबाचा दहशतवादी झबिउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदालसह ११ जणांच्या शिक्षेवर विशेष ‘मकोका’ न्यायालय २ आॅगस्ट रोजी निर्णय घेणार

Jundal gets punishment on Tuesday | जुंदालला मंगळवारी शिक्षा होणार

जुंदालला मंगळवारी शिक्षा होणार


मुंबई : सन २००६ मध्ये औरंगाबाद येथे पकडेलल्या शस्त्रसाठाप्रकरणी लष्कर-ए- तय्यबाचा दहशतवादी झबिउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदालसह ११ जणांच्या शिक्षेवर विशेष ‘मकोका’ न्यायालय २ आॅगस्ट रोजी निर्णय घेणार आहे. शनिवारी सरकारी वकिलांनी या सर्व दोषींना कोणतीही दया न दाखवता जास्तीत जास्त शिक्षा ठोठावावी, अशी मागणी न्यायालयापुढे केली.
दोषींच्या शिक्षेबाबत बचावपक्षाच्या वकिलांनी व सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचे दाखले दिल्याने विशेष मकोका न्यायालयाने यावर विचार करण्यासाठी वेळ घेत २ आॅगस्ट रोजी दोषींच्या शिक्षेबाबत निकाल देऊ, असे स्पष्ट केले. औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी गुरुवारी विशेष मकोका न्यायालयाने अबू जुंदालसह ११ जणांना दोषी ठरवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jundal gets punishment on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.