मातेची तान्हुलीसह तलावात उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2015 00:36 IST2015-07-31T00:36:39+5:302015-07-31T00:36:39+5:30
एकता कॉलनीतील एका महिलेने पाच महिन्याच्या तान्हुलीसह नजिकच्या खैरलांजी येथील तलावात उडी घेतली. आईला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र चिमुकलीचा मृत्यू झाला.

मातेची तान्हुलीसह तलावात उडी
साकोली : एकता कॉलनीतील एका महिलेने पाच महिन्याच्या तान्हुलीसह नजिकच्या खैरलांजी येथील तलावात उडी घेतली. आईला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
संगीता अनिकेत हटवार (२४) असे आईचे नाव असून जिज्ञाषा असे मृत चिमुकिलीचे नाव आहे. संगीताचे पती अनिकेत साकोली एसटी आगारात वाहक आहेत. दुपारच्या सुमारास संगीता मुलीला घेऊन आधी घराशेजारीच असलेल्या नवतलावात आत्महत्या करण्यासाठी जात होती. मात्र गावकऱ्यांना दिसताच तिला त्यांनी समजावून परत पाठविले. मात्र घरी न जाता ती सरळ नजिकच्या खैरलांजी गावाकडे निघाली. तेथील तलावात मुलीला घेवून उडी घेतली.