समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणार
By Admin | Updated: October 4, 2014 01:35 IST2014-10-04T01:35:04+5:302014-10-04T01:35:04+5:30
दस:याच्या शुभमुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाने शुक्रवारी पनवेल व उरण मतदारसंघातील मतदारांकरिता जाहीरनामा प्रकाशित केला. प

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणार
>पनवेल : दस:याच्या शुभमुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाने शुक्रवारी पनवेल व उरण मतदारसंघातील मतदारांकरिता जाहीरनामा प्रकाशित केला. पनवेल विधानसभेतील मतदारांकरिता बाळाराम पाटील यांच्या जाहीरनाम्याचे अनावरण माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी केले. तर उरण मतदारसंघातील मतदारांकरिता आमदार विवेक पाटील यांच्या जाहीरनाम्याचे अनावरण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेकापचे पनवेल विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील म्हणाले, की शेकाप दिलेला शब्द कायम पाळत आलेला आहे. त्यामुळे जाहीरनाम्यातील प्रत्येक काम पूर्ण केले जाईल. शेकापची ऐतिहासिक निशाणी खटारा पुन्हा मिळाल्याने कार्यकत्र्यामध्ये उत्साह दिसत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
आमदार विवेक पाटील यांनी सांगितले की, आम्ही केलेली विकासकामे म्हणजेच आम्ही पाळलेले जाहीरनाम्यातील वचन आहे. या वेळी जाहीर केलेली कामे 1क्क् टक्के पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. उरणच्या सर्वागीण विकासाचा अंतर्भाव असणारा आमचा जाहीरनामा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे.
अतिशय वेगळय़ा धाटणीच्या या जाहीरनाम्यातील सादरीकरणात वेगळेपण जाणवते. अन्य पक्षांच्या नेहमीच्या रटाळ निबंध स्वरूपाला छेद देत शेकापने या वेळेस छायाचित्रंच्या माध्यमातून मतदारांर्पयत पोहोचण्याचा स्तुत्य मार्ग अवलंबिला आहे.
याप्रसंगी आमदार विवेक पाटील, शेकापचे पनवेल विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
सर्वच प्रमुख्य मुद्दय़ांचा समावेश
च्जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक समाजातील व्यक्तींना समाविष्ट करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज कलादालन, डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, वारकरी भवन, अत्याधुनिक शिक्षण, झोपडपट्टी पुनर्विकास, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, मुबलक पाणीपुरवठा, सिडको वसाहतीतील नागरी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका, सर्वसामान्यांसाठी घरांची निर्मिती, टोलमुक्त रोड, रोजगाराभिमुख व्यवसायिक प्रशिक्षण, जेनेरिक औषधांची सेंटर्स, माध्यान्ह भोजन योजना, महिलांसाठी वसतिगृह व पाळणाघरे, स्वतंत्र पासपोर्ट केंद्र, महिलांसाठी स्वयंरोजगार व स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत केंद्रे, मच्छीमार व शेतक:यांसाठी शीतगृहे, गावठाण विस्तार योजना, फ्री वायफाय झोन, पर्यटन विकास, घनकचरा व्यवस्थापन योजना, प्रदूषणमुक्त नद्या, आदिवासी विकास, अंतर्गत वाहतूक व्यवस्था, सेंट्रल किचन योजना आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.