बुलेट ट्रेनचा प्रवास भुयारी मार्गाने?
By Admin | Updated: September 16, 2014 01:00 IST2014-09-16T01:00:17+5:302014-09-16T01:00:17+5:30
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रेल्वेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

बुलेट ट्रेनचा प्रवास भुयारी मार्गाने?
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रेल्वेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या बुलेट ट्रेनसाठी जपानसह आता चीननेही अर्थ आणि तंत्रसहाय्य पुरवण्याची तयारी दर्शविली आहे. बुलेट ट्रेनच्या कामात रुची दाखवणा:या चीनच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी सीएसटी स्थानकाला भेट देतानाच मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली. या भेटीत मुंबई आणि अहमदाबाद शहरात बुलेट ट्रेनभुयारी मार्गातूनच न्यावी, अशी सूचना यावेळी शिष्टमंडळाने केली. मध्य रेल्वे प्रशासनानेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
चीनच्या परिवहन मंत्रलयाचे उपमंत्री आणि नॅशनल रेल्वे अॅडमिनिस्ट्रेशनचे मुख्य अधिकारी लू डाँग फू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या सीएसटी स्थानकाला भेट देतानाच त्याची माहिती घेतली. यावेळी बुलेट ट्रेन कशाप्रकारे चालवता येईल याबाबत चर्चाही करण्यात आली. शहरी मार्गात बुलेट ट्रेन उन्नत मार्गाने चालवताना कशा अडचणी येतील यावर चर्चा करताना भुयारी मार्गाचा पर्याय चिनी शिष्टमंडळाने ठेवला.
याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले की, या ट्रेनचे सुरुवातीचे आणि शेवटचे स्थानक भुयारी मार्गात ठेवून दोन्ही शहरात ही ट्रेन शिरताच ती भुयारी मार्गातून धावणो सोयीचे ठरेल. अशा प्रकारची ट्रेन चीनमध्ये धावत असल्याचे शिष्टमंडळाकडून मध्य रेल्वेच्या अधिका:यांना सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईत ही ट्रेन शिरताच ती भुयारी मार्गाने धावावी, अशी सूचना त्यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही ट्रेन वान्द्रे-कुर्ला संकुलातून सोडण्याचा विचार रेल्वेचा आहे. त्यापेक्षा चर्चगेट किवा सीएसटी येथून सोडल्यास प्रवाशांना सोयीस्कर पडेल, असेही मत यावेळी मांडण्यात आले. (प्रतिनिधी)
बुलेट ट्रेन भुयारातून वर येण्यासाठी 200 मीटर लांबीमागे एक मीटर उंची वाढू शकते. म्हणजेच ही गाडी दहा मीटर उंचीवर जाण्यासाठी दोन किलोमीटर लांब धावावी लागेल. मुंबईत उन्नत मार्ग उभारणो सध्या कठीण असून त्याला खर्चही अवाढव्य येतो. त्यामुळे भुयारी मार्ग हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगण्यात आले.