शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 14:52 IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.  

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.  कारण येथे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आता पत्रकारांच्या कुटुंबियांनाही गुन्हेगार टार्गेट करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे पत्रकारच नव्हे तर नागपूर हादरून गेले आहे.

रविकांत कांबळे असे पत्रकाराचे नाव आहे. ते पवननगर दिघोरी नाका उमरेड रोड येथे राहतात. नागपुरातील एका वेब न्यूज पोर्टलमध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून ते कार्यरत आहेत. उषा सेवकदास कांबळे (५४) असे मृत आईचे तर राशी रविकांत कांबळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता रविकांत यांची आई व मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच दोघांचेही मृतदेह पोत्यात भरून ते उमरेड रोडवरील विहीरगाव येथील नाल्यात फेकले. रविवारी सकाळी १०.३० वाजता एका व्यक्तिला पोत्यात मृतदेह आढळून आला. त्याने लगेच पोलिसांचा सूचना दिली. दरम्यान शनिवारी सायंकाळीच रविकांत यांनी आई व मुलगी बेपत्ता असल्याची पोलीसात तक्रार दिली होती. तसेच फेसबुकवरही रविवारी सकाळी या दोघींचा फोटो पोस्ट केला होता. त्यानुसार पोलिसांनी रविकांत यांना सूचित केले. ते घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली.पत्रकारांवर हल्ले हे होत असतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या आई व मुलीचा खून करण्याची ही नागपूरच्या इतिहासातील पहिलीच घटना होय. याबाबत माहिती होताच नागपुरातील पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे.  

 

टॅग्स :nagpurनागपूरMurderखूनCrimeगुन्हाJournalistपत्रकार