दाऊदच्या 'हॉटेल दिल्ली जायका' वर पत्रकार एस. बालाकृष्णनची मालकी

By Admin | Updated: December 9, 2015 17:32 IST2015-12-09T17:21:55+5:302015-12-09T17:32:44+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईस्थित 'हॉटेल दिल्ली जायका' चा लिलाव झाला असून ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी ४.२८ कोटीला खरेदी केले आहे.

Journalist S. David on 'Hotel Delhi Joyaka' Ownership of Balakrishnan | दाऊदच्या 'हॉटेल दिल्ली जायका' वर पत्रकार एस. बालाकृष्णनची मालकी

दाऊदच्या 'हॉटेल दिल्ली जायका' वर पत्रकार एस. बालाकृष्णनची मालकी

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईस्थित 'हॉटेल दिल्ली जायका' चा लिलाव झाला असून ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी ४.२८ कोटीला हे हॉटेल खरेदी केले आहे.
'हॉटेल दिल्ली जायका' ची किंमत लिलावासाठी १.१८ कोटींपासून सुरुवात झाली, त्यानंतर ४.२७ कोटींपर्यंत येऊन अंतिम टप्प्यात आल्यानंतर मी त्यावर एक लाख रुपयांची वाढ करुन एकूण ४.२८ कोटीला खरेदी केल्याचे पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी मिडीयाला सांगितले. 
मुंबई बॉम्बस्फोटानंतर फरार असलेल्या मोस्ट वॉण्टेड दाऊदच्या मुंबई व देशभरातील मालमत्ता केंद्र सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. त्याची दहशत संपविण्यासाठी या प्रॉपर्टी लिलावाद्वारे विकण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. खासगी कंपन्यांकडे त्याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

Web Title: Journalist S. David on 'Hotel Delhi Joyaka' Ownership of Balakrishnan