ठाण्याच्या २४ जागांसाठी जितेंद्र आव्हाडांना मंत्रिपद
By Admin | Updated: May 30, 2014 01:51 IST2014-05-30T01:51:10+5:302014-05-30T01:51:10+5:30
राष्ट्रवादीच्या कोट्यातून गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली

ठाण्याच्या २४ जागांसाठी जितेंद्र आव्हाडांना मंत्रिपद
अतुल कुलकर्णी, मुंबई - राष्ट्रवादीच्या कोट्यातून गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली. विजयकुमार गावित यांची मुलगी भाजपात गेल्यामुळे गावित यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या रिक्त जागेवर आव्हाड यांना घेण्यात आले. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना राष्टÑवादीने पक्षात बदल करण्याचे संकेत दिले होते़ त्यानुसार, पहिला बदल यानिमित्ताने समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या २४ जागा आहेत. त्यापैकी गेल्या विधानसभेला काँग्रेसने १३ व राष्टÑवादीने ११ जागा लढवल्या होत्या. त्यात काँग्रेसचा एक तर राष्टÑवादीचे पाच आमदार निवडून आले होते. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीचा (पान ४ वर)