उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी संबंध नाही; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:54 AM2022-10-05T05:54:45+5:302022-10-05T05:55:25+5:30

आमचा त्या मेळाव्याशी किंचितही संबंध नाही, असे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

jitendra awhad said no connection with uddhav thackeray dasara melava | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी संबंध नाही; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी संबंध नाही; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा होणारा दसरा मेळावा हा महाविकास आघाडीचा मेळावा असल्याची टीका एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी महाविकास आघाडीचा नाही, तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. आमचा त्या मेळाव्याशी किंचितही संबंध नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.

डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात राष्ट्रवादीतर्फे भाजप मंडळ उपाध्यक्ष संदीप माळी यांच्याविरोधात मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, काँग्रेस नेते संतोष केणे, शिवसेना जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख विवेक खामकर आदी उपस्थित होते.

मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवतीर्थ हे समीकरण आहे. महाविकास आघाडीतर्फे जे बॅनर लावले, त्याबाबत आव्हाड यांनी आपण दहावी-बारावीच्या मुलांना शुभेच्छा देतो म्हणजे काय परीक्षेला जाऊन बसतो का? असा टोला विरोधकांना लगावला.

गुंडांना अभय

गुडांना अभय मिळत असून, त्यांच्यामुळे सत्ताधारी बदनाम होत आहेत. या संदीप माळी याने लहान मुलीवर बलात्कार केला, आत्महत्या केलेल्या केबल व्यावसायिकाने माळीसह अन्य १५ जणांची नावे लिहून ठेवली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, तरीही तपास यंत्रणा गप्प का बसली आहे, असा सवाल आव्हाड यांनी केला.
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: jitendra awhad said no connection with uddhav thackeray dasara melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.