शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी सुरू...' जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने खळबळ; शेअर केला 'त्या' महिलेचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 19:10 IST

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुंबई: क्रूर औरंगजेब हिंदूद्वेष्ठा नव्हता, असे वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कारमध्ये बसलेली महिला दिसत आहे. या व्हिडिओसोबत आव्हाड यांनी लिहिले की, "354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणाऱ्या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ. त्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरू आहे,'' असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना महिला त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी आव्हाडांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने खांद्या दाबून बाजूला हो असे म्हणत ढकलले, अशी तक्रार महिलेने केली होती.  विशेष म्हणजे, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलेलं 354 हे विनयभंग आणि लैंगिक छळाशी संबंधित कलम आहे, तर 376 हे बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधीत आहे. आव्हाडांच्या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा