शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

“अजित पवार अन् माझ्यात कोणतेच वाद नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत...”; जयंत पाटलांचे सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 13:06 IST

Jayant Patil And Ajit Pawar Group: कोल्हापूर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो राष्ट्रवादीनेच लढावा अशी आमची इच्छा आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Jayant Patil And Ajit Pawar Group:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभरात दौरे, सभा सुरू केल्या आहेत. अलीकडेच बीडमध्ये शरद पवारांची सभा झाली. या सभेला तुफान गर्दी होती, असे सांगितले जाते. बीडनंतर आता शरद पवार यांची कोल्हापूरला सभा होणार आहे. कोल्हापूरनंतर जळगाव आणि पुण्यात सभा होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबत बोलताना, कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो राष्ट्रवादीनेच लढावा अशी आमची इच्छा आहे. तसेच अजित पवार आणि माझ्यात कोणतेच वाद नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

शरद पवार नेहमीच पुरगोमी विचारांचे राहिले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रात जपणे आवश्यक आहे. जनतेमध्ये समतेचा संदेश देणे गरजेचे आहे. शरद पवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत. हा गैरसमज काही जण पसरवत आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक खूप लांब आहे. पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्याविरोधात जनता आहे आणि जनतेपर्यंत जाऊन शरद पवार आपली भूमिका मांडत आहेत. शरद पवार साहेब यांच्याबद्दल हसन मुश्रीफ यांना आदर आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगतील. कोल्हापूरच्या सभेत याची उत्तरे मिळतील. महाविकास आघाडीच्या सभा लवकर सुरु होतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

अजित पवार अन् माझ्यात कोणतेच वाद नाहीत

शरद पवार यांनी सोडून गेले ते आजही साहेबांना मानतात. ते आग्रहाने सांगतात की, ते माझा विठ्ठल आहे. जे गेले ते शरद पवार यांचा फोटो लावतात. त्यावर मी आक्षेप घेणे बरोबर नाही. शरद पवार राजकारणात त्यांना आणले नसते तर ते आजपर्यंत या ठिकाणी पोहोचले नसते. अजित पवार आणि माझ्यामध्ये कोणतेच वाद नाहीत. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत त्यांच्यासोबत राहिलोय, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक बाहेर आले. त्यानंतर आम्ही काहीजणांनी जाऊन त्यांची भेट घेतली. मलिक यांना किडनीचा त्रास सुरु झाला आहे. विश्रांती घेण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ते राजकीय विषय कोणाशीही बोलत नाहीत, त्यामुळे त्यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, त्यांच्यासंदर्भात राजकीय बोलून मी त्यांना अडचणीत आणणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस