शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सर्व आमदार साहेबांच्या सोबतच; शरद पवारांच्या विचारधारेवर ठाम- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 15:22 IST

जयंत पाटलांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न

Jayant Patil, Maharashtra Political Crisis | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडानंतर रोज नवनवीन बातम्या येत आहेत. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यापासून राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील काही आमदार नव्याने अजित पवारांना पाठिंबा देताना दिसत आहेत. तशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे असताना, आम्ही सारे आमदार शरद पवार यांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.

'शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे,' असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. हे बडवे नेमके कोण याची चर्चाही त्यावेळी रंगली होती आणि त्यानिमित्ताने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशी नावे समोर आली होती. मात्र आता जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार गट कामाला लागला असल्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे सांगितले जात होते, पण जयंत पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नव्हता. या दरम्यान, सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून मी शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे. शरद पवार यांच्यासोबत असणारे आम्ही सर्व आमदार अद्यापही साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी केले आहे.

नक्की काय सुरू आहे चर्चा?

शरद पवार यांच्या सोबतच राहण्याची भूमिका जयंत पाटील घेत आहेत, तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्यावर टीका करत शरद पवार गटाचा किल्ला जयंत पाटील यांनीच लढवला होता. मंत्रिमंडळात भाजपाचे 10 शिवसेनेचे 10 तर राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आहेत. जयंत पाटील यांना अजित पवार गटात आणण्यात यश आले, तर त्यांना मंत्रीपद दिल्यास तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 10 मंत्री असतील. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या होत्या. त्या वेळी शरद पवार यांच्यासोबत असलेले बरेच आमदार गेल्या आठ दिवसात अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यात राजेंद्र शिंगणे, मकरंद पाटील, किरण लहामटे यांचा समावेश आहे. आशुतोष काळे परदेशात होते. परतल्यानंतर ते थेट अजित पवार यांच्या गटात गेले. अद्याप शरद पवार यांच्यासोबत असलेल्यांपैकी काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील असा दावाही अजित पवार गटाकडून केला जात आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस