शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

संजय शिरसाटांच्या 'त्या' विधानावर जयंत पाटलांचा टोला, एकाच वाक्यात दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 18:40 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकारांसोबत बोलत असताना, काही पत्रकारांनी त्यांना संजय शिरसाट यांनी त्यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले होते...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी केला होता. एवढेच नाही, तर शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील का रडत होते, हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल करत, शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणाही साधला होता. यावर पत्रकारांनी विचारले असता जयंत पाटील यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील? -राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकारांसोबत बोलत असताना, काही पत्रकारांनी त्यांना संजय शिरसाट यांनी त्यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले, यावर पाटील म्हणाले, "संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलीटी जास्त असेल नाही का? त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिअॅक्शन विचारणे म्हणजे जरा पुढेच जाते." 

नमकं काय म्हणाले होते संजय शिरसाट? -शिरसाट म्हणाले, "राष्ट्रवादीला आमचा पुळका का आला आहे? हे कळायला मार्ग नाही. जे जयंत पाटील आज स्वतःच भाजपच्या वाटेवर आहेत, ते असे म्हणतात. ज्या पक्षाची स्थापनाच मुळात गद्दारीतून झाली आहे. सोनिया गांधी यांच्या सोबत केलेली गद्दारी, त्यातून निर्माण झालेले हे सर्व आणि ते आम्हाला आता गद्दारीची भाषा शिकवणार, हा संपूर्ण हास्यास्पद प्रकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांची चिंता करत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते.

शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा जयंत  पाटील का रडत होते हे तुम्हाला माहीत आहे? त्यांना उद्या काय घडणार हे माहीत आहे. त्यामुळे आता काय करू, शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला, तर मी तर मेलोच. म्हणून ते ओक्साबोक्सी रडत होते. ते शरद पवार यांच्या राजीनाम्यावर रडत नव्हते. त्यांचं रडणं वेगळं होतं. तुम्हाला सांगतो, असं बोलणारे पटकन उड्या मारतात. त्यामुळे काही दिवस वाट पाहा, तुम्हाला त्यांचे मार्गक्रमण कुठे तरी झालेले दिसेल, असेही शिरसाट यांनी म्हटले होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस