लोकमतच्या जयंत धुळप यांना शोध पत्रकारिता पुरस्कार

By Admin | Updated: January 3, 2017 15:02 IST2017-01-03T15:02:23+5:302017-01-03T15:02:23+5:30

यंदाचा राजाभाऊ देसाई स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार लोकमतच्या जयंत धुळप यांना जाहीर करण्यात आला आहे.

Jayant Dhulap of Lokmat for Research Journalism Award | लोकमतच्या जयंत धुळप यांना शोध पत्रकारिता पुरस्कार

लोकमतच्या जयंत धुळप यांना शोध पत्रकारिता पुरस्कार

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - यंदाचा राजाभाऊ देसाई स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार लोकमतचे कोकण विभागीय समन्वयक तथा विशेष प्रतिनिधी जयंत धुळप यांना जाहीर करण्यात आला आहे. डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या जन्मदिनी रोहा तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात.
 
यापार्श्वभूमीवर यंदाचा राजाभाऊ देसाई स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार 'लोकमत'च्या जयंत धुळप यांना जाहीर करण्यात आला आहे. तर यंदाचा डॉक्टर चिंतामणराव देशमुख स्मृती पत्रकारीता पुरस्कार दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच जनार्दन शेडगे स्मृती उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देऊन प्रहार मुंबई आवृत्तीचे अतुल मळेकर यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अप्पा देसाई यांनी दिली आहे. 
 
दरवर्षी 14 जानेवारी रोजी होणारा पुरस्कार वितरण कार्यक्रम यावर्षी  21 जानेवारी रोजी रोह्यातील डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात होणार आहे, अशी माहिती रोहा तालुका पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आली आहे.
 

Web Title: Jayant Dhulap of Lokmat for Research Journalism Award