जवानाच्या आत्महत्येची चौकशी होणार
By Admin | Updated: March 6, 2017 05:35 IST2017-03-06T05:35:09+5:302017-03-06T05:35:09+5:30
आरपीएफ चौकीत तैनात असलेल्या जवानाने शनिवारी रात्री केलेल्या आत्महत्येच्या घटनेची लोहमार्ग पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

जवानाच्या आत्महत्येची चौकशी होणार
मुंबई : मुंबई सेन्ट्रल स्टेशमधील आरपीएफ चौकीत तैनात असलेल्या जवानाने शनिवारी रात्री केलेल्या आत्महत्येच्या घटनेची लोहमार्ग पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तर आरपीएफकडून अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यातआले आहेत.
शनिवारी रात्री दलवीर सिंह (२५) याने मुंबई सेन्ट्रल स्टेशनमधील आरपीएफच्या चौकीत आपल्या रायफलमधून स्वत:वर दोन गोळ््या झाडून घेतल्या. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दलवीर सिंह याला ट्रेन नंबर १२९0१ या गुजरात मेलमध्ये ड्युटी देण्यात आली होती. परंतु त्याआधीच त्याने आत्महत्या केली. त्याचा मोबाईलवरील शेवटच्या कॉलसह अन्य माहिती घेतली जात आहे. (प्रतिनिधी)