जानकर यांच्या कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 06:15 IST2016-10-12T06:15:41+5:302016-10-12T06:15:41+5:30
भगवानगड येथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

जानकर यांच्या कार्यालयाची तोडफोड
पुणे/परळी (बीड) : भगवानगड येथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्त व्याचे राज्यात पडसाद उमटले. वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तोडफोड केली.
रासपचे प्रदेश सचिव बाळासाहेब कोकरे यांच्या पत्नी व मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जानकर यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केली. त्यांच्या या वक्त व्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रूपाली चाकणकर व इतर कार्यकर्त्यांनी हिंगणे येथील रोकडोबा मंदिराजवळच्या जानकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. जानकर यांचे कार्यालय बंद असल्याने फलकाची मोडतोड करण्यात आली. सुमारे अर्धा तास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निर्दशने सुरू होती. जानकर यांची भाषा मंत्रिपदाला शोभणारी नाही, त्यांनी पुन्हा अशी वक्त व्ये केली तर त्याला चोख उत्तर देण्यात येईल, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
जानकर यांना राष्ट्रवादी
अद्दल घडविणार
भगवान गडावर जानकर यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर ज्या भाषेत टीका केली, ती राज्याचे सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का याचा खुलासा त्यांनी करावा. जानकर पुण्यात कधी येतात, याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांच्या भाषणाचा त्यांना पश्चाताप होईल अशी अद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडविली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिला आहे.
परळीत पुतळा जाळला
जानकर यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरल्याच्या निषेध करत परळीत (बीड) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन केले. जानकरांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.