शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

फौजदार झाले जमादार

By admin | Updated: December 21, 2014 01:26 IST

कामाचा व्याप वाढल्याने खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो जमादारांना अवघ्या दोन महिन्यांसाठी प्रत्यक्ष फौजदार बनविण्यात आले होते.

यवतमाळ : कामाचा व्याप वाढल्याने खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो जमादारांना अवघ्या दोन महिन्यांसाठी प्रत्यक्ष फौजदार बनविण्यात आले होते. मात्र काम संपल्याने आता त्यांना पूर्वपदावर जमादार म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. त्यांना आता अशा आणखी नियुक्त्या मिळण्याची (मुदतवाढ) प्रतीक्षा आहे.राज्य पोलीस दलात खात्यांतर्गत परीक्षा, त्याचे निकष, नियुक्त्या याचा सुरुवातीपासूनच प्रचंड गोंधळ आहे. त्याचा फटका मात्र सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो आहे. फौजदार पदासाठी खात्यांतर्गत परीक्षा घण्यात आली होती. त्यात अनेक उमेदवार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र आजही त्यांना फौजदार म्हणून नियुक्ती देण्यात आली नाही. कारण नियुक्ती देताना गुणवत्तेऐवजी सेवाज्येष्ठता हे निकष लावले गेले. त्यामुळे काठावर पास झालेल्या आणि सवलतीच्या गुणांनी पास केल्या गेलेल्या जमादारांना फौजदार म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या. तर सेवाज्येष्ठता नसलेले मात्र उत्कृष्ट गुण मिळविणारे जमादार वंचित राहिले. अशा ज्येष्ठतेच्या तोंडावर असलेल्या काही जमादारांना महासंचालकांच्या विशेष आदेशाने विधानसभा निवडणुकीचा व्याप पाहून दोन महिन्यांसाठी फौजदार म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. नियोजित कालावधीत पूर्ण झाल्याने या नियुक्त्या आपसूकच रद्द झाल्या. कालपर्यंत फौजदार म्हणून मिरविणारे अधिकारी आता पुन्हा पूर्वपदावर सहाय्यक फौजदार-जमादार बनले आहेत. पुन्हा केव्हा कायमस्वरूपी किंवा हंगामी नियुक्त्या मिळणार याची त्यांना प्रतीक्षा आहे. कारण सर्वच जिल्ह्णात पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. फौजदारासह अन्य अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. रोज नवनवीन गुन्हे दाखल होत आहे. या गुन्ह्णांच्या तपासासाठी पुरेसे अधिकारी उपलब्ध नाहीत. त्यानंतरही दोन महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांना मुदतवाढ दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)च्राज्यात कोणत्याच आयुक्तालयात किंवा परिक्षेत्रात आणखी दोन महिन्यांसाठी नियुक्त्या दिल्या गेल्या नसल्या तरी कोकण विभाग मात्र त्याला अपवाद ठरला आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक टी.बी. मुरडनर यांनी आपल्या १० डिसेंबर २०१४ च्या आदेशानुसार दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या फौजदारांना एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. च्ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्णात या तात्पुरत्या नियुक्त्या देण्यात आल्या. कोकणचे महानिरीक्षक दोन महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांना मुदतवाढ देऊ शकतात तर राज्यातील अन्य पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्त मुदतवाढ का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.