‘जलयुक्त’चे श्रेय भाजप-शिवसेना दोघांचे

By Admin | Updated: July 2, 2016 04:20 IST2016-07-02T04:20:11+5:302016-07-02T04:20:11+5:30

शासनाची जलयुक्त शिवार व शिवसेनेची शिव जलक्रांती या योजनांमुळे राज्यात मोठी जलक्रांती झाली आहे.

'Jalukt' is credited with BJP-Shiv Sena both | ‘जलयुक्त’चे श्रेय भाजप-शिवसेना दोघांचे

‘जलयुक्त’चे श्रेय भाजप-शिवसेना दोघांचे


पुणे : शासनाची जलयुक्त शिवार व शिवसेनेची शिव जलक्रांती या योजनांमुळे राज्यात मोठी जलक्रांती झाली आहे. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या कामांचे श्रेय केवळ शिवसेनेचे नसून भाजप-सेना सरकारचे आहे, त्यामुळे भविष्यात या चांगल्या कामाचे फळ लोक आम्हाला नक्की देतील, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले.
लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पालखी सोहळ््यात दर वर्षी स्वच्छता दिंडीचे आयोजन केले जाते. या स्वच्छता दिंडीचे शुक्रवारी पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रस्थान झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.
या दोन्ही योजनांमुळे गेल्या वर्षभरात चांगली कामे झाली आहेत. त्याचे परिणाम लातूर आणि धाराशीव सारख्या दुष्काळी भागात दिसत आहेत. स्वच्छ मनातूनच स्वच्छ कारभार होत असतो, स्वच्छ आचार आणि विचार करणारी नवी पिढी घडविण्यासाठी स्वच्छता मोहिम अत्यंत महत्वाची आहे. त्यामुले स्वच्छतेच्या दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jalukt' is credited with BJP-Shiv Sena both