जालन्यात दारूच्या पैशावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने मित्राच्या डोक्यात चाकु खुपल्याची घटना उघडकीस आली. ही घटना शनिवारी (०२ ऑगस्ट २०२५) दुपारी नूतन वसाहत परिसरात धडली. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
शौकत शेख (वय, ३५) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी शौकत हा त्याचा मित्र पांडुरंग थोरात याच्यासोबत दारू पित असताना पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका पेटला की, पांडुरंगने शौकतच्या चाकू खुपसला आणि घटनास्थळावरून पळून गेला. शौकत हा चाकू डोक्यात अडकलेल्या अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून चाकू बाहेर काढला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. आरोपी पांडुरंग थोरात फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी शौकत हा डोक्यात चाकू अकडलेल्या अवस्थेत रुग्णालयात आला. शौकतच्या एका मित्राने त्याच्यावर हल्ला केल्याची त्याने माहिती दिली. आमच्या वैद्यकीय टीमने तात्काळ रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यात अडकलेला चाकू काढून घेतला. त्याची प्रकृती स्थिर आहे.