जालन्यात २ सख्ख्या भावांचा विहीरीत पडून मृत्यू

By Admin | Updated: August 8, 2016 12:30 IST2016-08-08T12:29:35+5:302016-08-08T12:30:29+5:30

जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील बेहेड गावात दोन सख्ख्या भावांचा विहीरीत पडून मृत्यू झाला.

In Jalna, 2 siblings fall into the well | जालन्यात २ सख्ख्या भावांचा विहीरीत पडून मृत्यू

जालन्यात २ सख्ख्या भावांचा विहीरीत पडून मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
जालना, दि. ८ - जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील बेहेड गावात दोन सख्ख्या भावांचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.  ईश्वर व अकुंश बावस्कर अशी त्या दोघांची नावे आहेत. 
हे दोघेही आज सकाळी शेतात जनावरांना पाणी पाजायला गेले होते.  ईश्वर (लहान भाऊ) हा विहीरीतून पाणी काढताना असताना त्याचा तोल गेला व तो विहीरीत पडला.  हे पाहताच अंकुशने त्याला वाचवण्यासाठी विहीरीत तत्काळ उडी मारली व पोहत जाऊन त्याने ईश्वरला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ईश्वरने अंकुशला मिठी मारल्याने त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. 

Web Title: In Jalna, 2 siblings fall into the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.