शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

...तर स्वाभिमानाचा 'एक्झिट' कधीही बरा!; पंकजा मुंडे राजकारणावर स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 10:13 IST

राजकारणात तुम्ही स्पष्ट आणि ठाम असाल तर तुमचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

नाशिक - मला संधी का मिळत नाही याचं उत्तर संधी देणाऱ्यांनी का दिली अन् न देणाऱ्यांनी का दिली नाही तेच देऊ शकतील. मी त्याचे उत्तर देऊ शकत नाही. जर ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले. त्या समाजासाठी समर्पित करण्याची मला मुभा नसेल तर तडजोडीचं राजकारण करणं मला शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक्झिट असतो तसा स्वाभिमानाचा एक्झिट कधीही बरा असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

नाशिक येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, विना स्वाभिमानाची तळी आपल्या ताटात वाढून घेण्यापेक्षा मला राजकारणातून बाहेर पडण्याची भीती कधीही वाटत नाही. कारण माझ्यासाठी हे स्पष्ट आहे. मी ज्या उंचीवर आहे तेथपर्यंत येणे सर्वांनाच जमते असं नाही. आज माझ्या एका ट्विटवर लाखो लोक जमतात. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो कायम राहावा असे राजकारण मला करता आले पाहिजे अन्यथा नको असं सांगत पंकजा मुंडे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 

माझ्यात संयम अनुभवाने आलाराजकारणात तुम्ही स्पष्ट आणि ठाम असाल तर तुमचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात मी राहीले आहे. त्यांचे राजकारण मी जवळून पाहिले आहे. ते कधीही कुणासमोर झुकले नाही. तोच वारसा मी पुढे चालवित आहे. माणसाच्या आयुष्यात कोणतीही परिस्थिती कायम रहात नाही. चांगले आणि वाईट दिवस येत जात असतात. फक्त ते संयमाने पार करावे लागतात. माझ्यामध्ये संयम हा अनुभवाने आला आहे. जीवनात येणारे अनुभव संयमाने पचवा ते खूप महत्त्वाचे असते असे मत पंकजा मुंडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.

...तर लेखिका झाले असतेजीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला कधी डॉक्टर, कधी पायलट तर कधी आर्किटेक्चर व्हायचे होते. पण एक मात्र नक्की मला खूप प्रसिद्ध व्हायचे होते. मला क्रिएटीव्ह फील्डमध्ये रहायला नेहमी आवडते. यामुळे मी जर राजकारणी झाले नसते तर लेखिका झाले असते. मला लिहिण्याची आवड लहानपणापासून आहे. सध्या मला आलेल्या अनुभवांवर काही लिहीत आहे. राजकारणात काही वेळा आपण जे बोलू शकत नाही ते मी लिहिणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

त्याचसोबत जीवनात येणाऱ्या संकटांचा विचार करता महाभार- तातील व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने पाहिले तर आपल्या पित्याचा शब्द कधीही खाली पडू न देणारे भीष्मपितामह होणे मला अधिक आवडेल आणि माझ्या आयुष्यात ते ओघाने आलेच आहे. असेही पंकजाताई म्हणाल्या.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारणBJPभाजपा