शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं- राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 22:55 IST

मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

औरंगाबाद- मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच औरंगाबाद येथे घडवून आणलेल्या दंगलीशी मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही, या मोर्चात मराठा क्रांती मोर्चाची मुले नव्हती, असे राज यांनी म्हटले आहे. तसेच या दंगलीतील घडवून आणलेल्या हिंसाचारात परप्रांतीयांचा सहभाग असल्याचेही राज यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामध्ये नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद येथे जाळपोळीच्या घटनाही घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. तर औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमध्ये जवळपास 60 कंपन्यांना आग लावण्यात आली होती. तेथील साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली होती. याबाबत राज ठाकरेंना पत्रकारांनी विचारणा केली असता, राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना मराठा समाजातील मुलांना राज यांनी क्लीन चिट दिली. तसेच मराठा मोर्चावेळी वाळूज औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांनी तोडफोड केली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. याचा अर्थ काय तर परप्रांतीय लोक आपल्या राज्यात येऊन रोजगार मिळवतात आणि अशा प्रकारे आपल्या शहराचे नुकसान करतात, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.या तोडफोडीत मराठा क्रांती मोर्चाचे तरुण नव्हते. मात्र मराठा क्रांती मोर्चाला नेतृत्व नसल्याने हे आंदोलन बदनाम झाल्याची खंतही राज यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून सुरू असलेल्या राजकारणावर राज यांनी प्रकाश टाकला. नाशिक महापालिकेची सत्ता माझ्याकडे असताना अडीच वर्षे पालिकेला आयुक्तपद नव्हते. राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न तेथील राजकीय पक्षांनी केला. मात्र आम्ही आयुक्तांविनाही महापालिका उत्तम चालवली. शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. पण सेना-भाजपाच्या नगरसेवकांना कामच करायची नसतील. तर आयुक्त असले काय आणि नसले काय, काय फरक पडतो, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे