शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दिसते ते सर्व असत्य!

By admin | Updated: September 12, 2014 00:48 IST

विश्वातील प्रत्येक गोष्ट बदलत असते. जी गोष्ट बदलत असते, त्याला आपण सत्य म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण विश्वात जे काही पाहतो. ते सत्य नसून, त्याच्या पाठीमागे वेगळेच काही विश्व आहे,

‘अध्यात्म व विज्ञान’ विषयावर व्याख्यान : गुर्जलवार यांचे प्रतिपादननागपूर : विश्वातील प्रत्येक गोष्ट बदलत असते. जी गोष्ट बदलत असते, त्याला आपण सत्य म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण विश्वात जे काही पाहतो. ते सत्य नसून, त्याच्या पाठीमागे वेगळेच काही विश्व आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार यांनी केले. सी. पी. अ‍ॅण्ड बेरार शिक्षण संस्थेच्यावतीने शंकरराव पाध्ये स्मृतिप्रीत्यर्थ ‘अध्यात्म व विज्ञान’ या विषयावर गुरुवारी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाल येथील सी. पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल सुनील देशपांडे होते. अतिथी म्हणून सी. पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दत्तात्रेय बाराहाते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्नल देशपांडे यांच्या हस्ते डॉ. गुर्जलवार यांचा सत्कार करण्यात आला. सामान्य माणूस विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी वेगवेगळ््या समजत असला, तरी विज्ञान व अध्यात्म हातात हात घालून कसा प्रवास करीत आहे, हे डॉ. गुर्जलवार यांनी आपल्या व्याख्यानातून अतिशय सहज व सोप्या शब्दात पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, जेथे विज्ञान संपते, तेथे भारतीय अध्यात्माचे दर्शन घडते. सध्या आपण एका छोट्याशा खिडकीतून विश्व पाहत आहोत. त्यामुळे आपण जे पाहतो, ते काहीही सत्य नाही. आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही असत्य आहे. त्यामुळे भारतीयांनी ते सत्य उलगडून काढले पाहिजे. मात्र त्यासाठी सर्वांना सत्याची प्रचिती यावी लागेल. एखाद्या गोष्टीचे ध्यान केले की, माणूस हा साधनेकडे जातो, आणि त्यातून त्याला ज्ञानप्राप्ती होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले. ं(प्रतिनिधी)