शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : ...यासाठी थिजलेली मनं आन् गोठलेले रक्तच हवे; 'अशा' रक्ताची येथे गरजच नाही, ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 20:50 IST

या देशात, मी हिंदू आहे, असे म्हणण्याची कुणाची हिंमत नव्हती. ती हिंमत, जी शिवसेना प्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवली आहे. हे हिंदूत्व असेच उभे राहिलेले नाही.

चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाणही गोठवला. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेले रक्तच हवे. असे म्हणत, शिवसेना म्हटले, की सळसळते आणि तापलेले रक्त. गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे गटावर जबरदस्त हल्ला चढवला. ते फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी बोलत होते.

सध्या, खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे गटाची, की एकनाथ शिंदे गटाची, हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. काल आयोगाने निर्णय होईपर्यंत शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. यानंतर, आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायांपैकी 3 पर्याय देण्याचे आदेश दिले होते. यानुसार उद्धव ठाकरे गटाने चिन्हासाठी आणि पक्षाच्या नावासाठीही आयोगाकडे पर्याय दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला.

गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही -उद्धव ठाकरे म्हणाले, "काल निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, शिवसेनेचे नाव गोठवले आणि चिन्हही गोठवले. शिवसेना प्रमुख ज्या निवडणूक चिन्हाची धनुष्यबाणाची पूजा करत होते, तो धनुष्यबाण आजही त्यांच्या देव्हाऱ्यात आहे. पण चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाणही गोठवला. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेले रक्तच हवे. असे म्हणत, शिवसेना म्हटले, की सळसळते आणि तापलेले रक्त. गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही. उलट्या काळजाची माणसं, जी आज फिरत आहेत. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. त्या आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली. अशा या उलट्या काळजाच्या माणसांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवले. या मागे जी महाशक्ती आहे, त्यांनाही आनंद होत असेल, की बघा आम्ही करून दाखवले. कशी ही माणसं, काय मिळवलं तुम्ही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. 

शिवसेना प्रमुखांनी दिलेली 'ती' हिंमत तुम्ही गोठवली -एवढेच नाही, तर ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला. ज्या शिवसेनेने मराठी मनं पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, त्या शिवसेनेचा घात तुम्ही करायला निघालात. शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलं. काय मिळणार तुम्हाला. या देशात, मी हिंदू आहे, असे म्हणण्याची कुणाची हिंमत नव्हती. ती हिंमत, जी शिवसेना प्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवली आहे. हे हिंदूत्व असेच उभे राहिलेले नाही. यासाठी शिवसेना प्रमुखांनी अनेक धोके पत्करले आहेत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

शिवसेना आणि तुमचा संबंध काय? -मुळात, शिवसेना आणि तुमचा संबंध काय? जे नाव माझ्या आजोबांनी दिलं, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवलं, तेच विचार घेऊन मी पुढे जात असताना, तुम्ही त्याचा घात करता? असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या 3 चिन्हांना पसंती दिली असल्याचे आणि पक्षासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(प्रबोधनकार ठाकरे) या 3 नावांचा पर्याय दिला असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग