शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 09:17 IST

आतापर्यंत २५ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. अन्य कोणत्या देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले आहे? सरकार हेही (घरोघरी जाऊन लस देणे) करू शकते.

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘घराशेजारी लसीकरण केंद्रे सुरू करण्यास शक्य आहे,’ अशी माहिती उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.घरोघरी जाऊन लस देण्याच्या मुद्द्यावर तज्ज्ञांच्या समितीने विचार केला. मात्र, घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी ‘घराशेजारी’ लस देणे शक्य आहे आणि हीच योग्य उपाययोजना आहे, असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आतापर्यंत २५ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. अन्य कोणत्या देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले आहे? सरकार हेही (घरोघरी जाऊन लस देणे) करू शकते. तुम्हाला तुमचा मार्ग शोधावा लागेल, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण करण्यात यावे, यासाठी व्यवसायाने वकील असलेल्या धृती कपाडिया व कुणाल तिवारी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या महिन्यात या याचिकवेरील सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला व तज्ज्ञांच्या समितीला याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत तज्ज्ञांच्या समितीने २५ मे रोजी झालेल्या बैठकीत चर्चा केल्याचे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वृद्ध, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींसाठी मर्यादित सुविधा असल्याचे समितीने मान्य करून अशा व्यक्तींच्या घराजवळ लसीकरण केंद्र असावे, असे समितीलाही वाटते. त्यानुसार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घराशेजारी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी २७ मे रोजी आदर्श कार्यपद्धतीही आखली आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

समितीने दिलेली कारणे गंभीर नाहीत !केंद्र सरकार व समितीने घेतलेल्या मेहनतीचे आम्ही कौतुक करतो. मात्र, घरोघरी जाऊन लसीकरण का केले जाऊ शकत नाही, याची समितीने दिलेली कारणे फारशी गंभीर नाहीत. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे धोके समितीने सांगितले आहेत, ते लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली तरी निर्माण हाेतात, असे न्यायालयाने म्हटले. मेपर्यंत लस घेतल्यानंतर २५,३०९ लोकांना रिॲक्शन झाली. त्यांपैकी १,१८६ लोकांची प्रकृती गंभीर झाली आणि ४७५ लोकांचा मृत्यू झाला, असे केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी आज, बुधवारपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालय