पारदर्शकतेचा मुद्दा फक्त प्रचारापुरता नाही - मुख्यमंत्री
By Admin | Updated: February 27, 2017 18:44 IST2017-02-27T18:44:01+5:302017-02-27T18:44:01+5:30
निवडणुकीनंतर पुढील वाटचाल महत्त्वाची आहे. पारदर्शकतेचा मुद्दा फक्त प्रचारापुरता नाही, व्यवहारातही पारदर्शकता आणणे गरजेचे आहे असे

पारदर्शकतेचा मुद्दा फक्त प्रचारापुरता नाही - मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - निवडणुकीनंतर पुढील वाटचाल महत्त्वाची आहे. पारदर्शकतेचा मुद्दा फक्त प्रचारापुरता नाही, व्यवहारातही पारदर्शकता आणणे गरजेचे आहे असे भाजपाच्या मुंबईतील नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दादर येथिल वसंत स्मृतीत नव्या नगरसेवकांना त्यांनी आज मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलतं होते. मुंबई महापिलकेच्या निवडुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने भरघोस यश मिळवले. भाजपाला प्रथमच मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनासाठी दावेदार मानले जात आहे. भाजपाने 227 जागापैकी 82 जागावर विजय मिळवत दुसऱ्या स्थान पटकावले आहे. तर 84 जागासह शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठीच्या दोन्ही पक्षाच्या राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.